आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

20 वर्षीय धडाकेबाज फलंदाज देवदत्त पडिक्कलने आक्रमक शतक ठोकून केला ‘हा’ विक्रम


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (आरसीबी) युवा स्फोटक फलंदाज देवदत्त पडिक्कल ने आयपीएल 2021 संस्मरणीय बनवला आहे. त्याने सामन्यात टी -20 लीगचे पहिले शतक केले.  राजस्थानच्या रॉयल्सविरूद्ध 20 वर्षीय पाडीकलने 51 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची खेळी केली.

 

या खेळीच्या जोरावर आरसीबीने राजस्थानला 10 गडी राखून पराभूत केले. यासह संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. चालू हंगामातील हे दुसरे शतक आहे.  तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबविरुद्ध शतकी खेळी केली होती.

 

देवदत्त पडिक्कलने विराट कोहलीबरोबर राजस्थानविरुद्ध 181 धावांची नाबाद भागीदारी केली. सुरुवातीच्या काही सामने आता त्याची बॅट चालली नव्हती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देखील तो कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यामुळे तो संघात उशीरा देखील दाखल झाला आणि पहिल्या काही सामन्यांत तो मुकला.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तो माघारी परतला, परंतु त्याला केवळ 11 धावा करता आल्या. केकेआरविरुद्ध त्याला मोठा डाव खेळता आला नाही आणि तो फक्त 25 धावा करू शकला.

देवदत्त पडिक्कल

डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल हा दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळतोय. मागील वर्षी त्याने युएईमध्ये 5 अर्धशतके झळकावून 473 धावा केल्या. देवदत्तने नुकतेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमत्कार केले होते आणि सात सामन्यात 737 धावा केल्या. या दरम्यान त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 907, अ दर्जाच्या 20  सामन्यात 87 च्या सरासरीने 137 आणि 36 टी -20 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 1408 धावा केल्या आहेत.

 

आयपीएलच्या रेकॉर्डवर एक नजर टाकली तर देवदत्त पडिक्कल हा शतक ठोकणारा 37 वा खेळाडू आहे. आतापर्यंत 18 भारतीय आणि 19 परदेशी खेळाडूंनी शतके ठोकली आहेत.  सर्वाधिक शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.  त्याने 6 शतके केली आहेत. विराट कोहली 5 शतकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. एकूण टी -20 लीगचे हे 65 वे शतक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्यात आरसीबीचा संघ सर्वात पुढे आहे. संघाने सर्वाधिक 14 शतके केली आहेत.  पंजाब किंग्ज 13 शतकांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here