आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

इम्पाला कार : 60 च्या दशकातील ती कार जिचे चाहते विदेशातच नाही तर भारतात सुद्धा होते.


 

1960 चे दशक काही असे होते, जेंव्हा रस्त्यांवर एक क्लासिक आणि वेगवान कार धावत असे. त्या कारीला बघून कुणाचीही नजर तिच्यावर थांबत असे. तिच्या इंजिनची दमदार आवाज आपल्या येण्याची बातमी देत असे.

ही कार कोणती साधारण कार नसून ती होती क्लासिक इम्पाला कार. तीच कार जीने कार चालवणाऱ्यांना सांगितले की काय असते शांतपणे कार चालवणे. कधी रस्त्यांवर राज्य करणारी ही कार आज काळाच्या ओघात धूळ खात पडली आहे. चला तर इतिहासाची पाने चाळून बघूया इम्पाला कारच्या कहानी बद्दल.

new google

इम्पाला कार

फोर्ड ला टक्कर देण्यासाठी बनवली इंम्पाला कार..

ते वर्ष होते 1958 चे आणि कार कंपन्यांमध्ये चांगलीच टक्कर चालू होती. या मध्ये फोर्ड कंपनी सर्वात पुढे होती. त्यांची कार  लोकांना जास्त आवडत होती. तर दुसरीकडे शेवरले फोर्डच्या मागे पडत होती. कंपनी काही असं करणार होती ज्यामुळे ती फॉर्डच्या समोर निघून जाईल. यासाठी त्यांनी एक नवीन कार बनवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानंतर शेवरले चे सगळे ऑटोमोबाईल इंजिनियर एक नवीन कार बनवण्याच्या कामास लागले. एवढेच नाही तर काही काळामध्ये त्यांनी ती कार बनवली. जेव्हा सगळ्यांनी ती कार पाहिली तेव्हा तिची डिझाईन बघून प्रत्येक जण हैराण झाला. दोन दरवाजे असणारी ही कंवर टेबल कार मार्केटमध्ये बाकीच्या कारीपेक्षा खूपच वेगळी होती.

इम्पाला कार

यासारखे क्लासिक आणि स्टायलिस्ट डिझाईन याअगोदर कोणी पाहिले नव्हते. डिझाईन  बघून तर कार पास केली होती परंतु आता परफॉर्मन्स चेक करण्याची वेळ होती.

पेट्रोल इंजन सोबत 136 हॉर्स पावर असणारी ही दमदार कार होती. तिला फक्त लोक साठीच नाहीतर वेगवान पडण्यासाठी बनवण्यात आले होते. भारी डिजाईन असून सुद्धा ही कार 150 किलोमीटर प्रति तास धावण्यात सक्षम होती.
एवढेच नाही तर 0 ते 60 मिल प्रति घंटा वेग पकडण्यासाठी ही फक्त 14 सेकंद घेत असे . तिचा परफॉर्मन्स बघून प्रत्येक जण हैराण झाला.

प्रत्येकाला हे कळले होते की त्यांनी एक कमालीची कार बनवली आहे. परंतु अजून या कारचे  नाव काय ठेवायचे हे ठरवले नव्हते. हिची डिझाईन आणि वेग बघून एक नाव विचारात घेतले जात होते. यासाठी हिला आफ्रिकेतील एका हरणाची प्रजाती इंम्पाला असे नाव देण्यात आले.

असं म्हणतात की ते हरिण सुद्धा इंपाला कार सारखे सुंदर आणि वेगवान धावते. यामुळेच त्याचे नाव त्या कारी साठी योग्य होते.

यानंतर 1958 मध्ये आपली कार इम्पाला लॉन्च केली. या कारची सुरुवातीची किंमत दोन हजार पाचशे डॉलर एवढी ठेवण्यात आली. यानंतर एक आशा काळाची सुरुवात झाली जिने कारींचे पूर्ण जगच बदलून टाकले.

राजेश खन्ना यांची आवडती कार

1958 मध्ये जशी इम्पाला कार मार्केट मध्ये आली तशी तिने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला. खूप कमी काळामध्ये ही एक   स्टेटस बनली. प्रत्येक जण तिला खरेदी करू इच्छित होता. रस्त्यावरून धावणारी इम्पाला कार बघून प्रत्येकाची नजर तिच्यावर पडून राहत.

बघता बघता इम्पाला विदेशात सुद्धा प्रसिद्ध झाली आणि भारतामधील लोक तिला खरेदी करण्यासाठी अक्षरशा पागल झाले. भारतामध्येही प्रसिद्ध झाली जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांनी ही कार चालवलेली लोकांना दाखवण्यात आली.असं म्हणतात की राजेश खन्ना यांना गाड्यांचा खूप शौक होता त्यांच्याकडे खूप साऱ्या महागड्या गाड्या होत्या पण त्यामध्ये सर्वात आवडती इम्पाला होती.

1960 मध्ये जेव्हा राजेश खन्ना फिल्मसाठी स्ट्रगल करत होते तेव्हा ते इम्पालाने  प्रवास करत होते.

1971 मध्ये राजेश खन्ना यांची फिल्म हाथी मेरे साथी मधील एका गाण्यांमध्ये राजेश खन्ना यांचा इंपाला मधुन प्रवास दाखवण्यात आला होता. जसे हे गाणे भारतातील लोकांनी पाहिले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये इंपाला खरेदी करण्याचा विचार बसला. यानंतर भारताच्या रस्त्यांवर सगळीकडे इंपाला कार दिसत होती.

इम्पाला कार

प्रत्येक वर्षी विकण्यात आल्या १० लाख गाड्या.

1958 मध्ये बनवण्यात आलेल्या इंपाला ला फक्त दोन दरवाजे होते. 1965 पर्यंत या डिझाईन तसेच ठेवण्यात आले, आणि 1965 मध्ये तिचे जे डिझाईन समोर आले त्याने हीची किंमत बदलून टाकली.

1965 मध्ये इम्पालाचे दरवाजे बदलून चार करण्यात आले आणि तिच्या डिझाईन मध्ये खूप सारे बदल करण्यात आले. याच्या इंजिनमध्ये बद्दल करून त्याला V8 करण्यात आले.  यामुळे तिच्या परफॉर्मन्स मध्ये वाढ झाली.

यानंतर पूर्ण जगामध्ये नवीन इम्पाला कारची मागणी वाढत गेली. एवढेच नाही तर शेवरले यांना एवढी मागणी करण्यात आली की त्यांचे प्रोडक्शन कमी पडू लागले.

आकड्यानुसार 1965 नंतर दरवर्षी एक मिलियन इम्पाला बनविण्यात येऊ लागल्या. एवढेच नाही तर त्या सगळ्या गाड्या कधी विकल्या जात होता ते कळत सुद्धा नव्हते. आकड्यांनुसार 1965 नंतर  जवळपास 7,46,800 V8 कार विकल्या. या वरून हे कळते की त्या काळी ती कार किती प्रसिद्ध होती.

 

1965 नंतर 1971 मध्ये शेव्रले ने इम्पाला चे नवीन मॉडेल बनवले. यामध्ये वेगावर जास्त भर देण्यात आला होता यामध्ये त्याची क्षमता 365 हॉर्स पावर एवढी होती. याचे इंजिन सुद्धा परवडणारे होते. याचा फायदा कंपनीला 1973 मध्ये आलेल्या ऑइल क्राईसेस मध्ये झाला. परंतु यासाठी इम्पालाच्या परफॉर्मन्स मध्ये कमतरता आली. आणि पुढे चालून ती बंद पडण्याचे हेच एक कारण बनले.

वेळेनुसार मार्केटमध्ये नवीन नवीन गाड्या आल्या. इम्पालाने आपल्या नावाच्या जीवावर काही वर्ष मार्केटमध्ये कार विकल्या. परंतु हळूहळू त्यांचा सेल कमी होत गेला. 1985 पर्यंत सेल एवढा कमी झाला की कंपनीला त्याचे प्रोडक्शन बंद करावे लागले.

वेळेनुसार न बदल केल्यामुळे इम्पालाचे एवढे मोठे साम्राज्य बंद पडले.

पुन्हा एकदा उगवला इम्पालाचा सूर्य

इम्पाला कार

1985 मध्ये इम्पालाचे प्रोडक्शन बंद करण्यात आले होते परंतु एवढ्या लवकर याला बंद पडु देणारे नव्हते. याची प्रोडक्शन जरूर बंद झाली होती परंतु इम्पाला अजून जिवंत होती.

कंपनी यामध्ये बदल करून नवीन कार बनवण्याच्या तयारीस लागली . शेवटी 1994 मध्ये तिचे नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले. या गाडीचा सेल पहिल्यासारखा तर नाही झाला पण एवढे वर्ष बंद पडून मार्केटमध्ये आल्यानंतर थोडाफार तरी झाला. लोक हिला विसरले नव्हते आणि नवीन मॉडेल आल्यानंतर पुन्हा एकदा खरेदी करायला लागले.

यानंतर शेव्रले यांनी इम्पालाचे नवीन नवीन मॉडेल अपडेट करण्यास सुरुवात केली. त्यांना आपला ब्रँड बंद पडू द्यायचा नव्हता. अमेरिकेसारख्या देशात अजूनही इम्पाला चालू आहे. लोक हीच्या नव्या मॉडेलला मनापासून स्वीकारत आहेत. परंतु भारताची गोष्ट झाली तर अजूनही लोक इंम्पालाच्या जुना मॉडेलला पसंती देतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here