आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

पडिक्कल-कोहलीची धुवाधार खेळी: बंगळुरुचा विजयी चौकार तर राजस्थानची पराभवाची मालिका कायम


 

आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 10 गडी राखून एकतर्फी विजय मिळविला. संघाच्या या विजयात सलामीवीर देवदत्त पडिक्कलच्या नाबाद शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थानने बंगळुरूला 178 धावांचे लक्ष्य दिले होते, जे संघाने एकही बळी न गमावता यश मिळविले. पडिक्कलच्या 101 धावांच्या नाबाद खेळीत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता तर विराटने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 चेंडूत 72 धावांची आकर्षक खेळी साकारली. यासह या संघाने या मोसमातील सलग चौथे विजय नोंदविला आहे.

बंगळुरु

राजस्थान रॉयल्स संघातील अव्वल क्रमांकाचे फलंदाज अपयशी ठरले तरी संघ 9 बाद 177 धावा करण्यात यशस्वी झाला. सलग तीन सामने जिंकणार्‍या बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ करत बंगळुरुला चांगली सुरुवात करून दिली. मोहम्मद सिराजने 27 धावा देत तीन गडी बाद केले तर हर्षल पटेलने शेवटच्या षटकात दोन विकेटसाठी 47 धावा देऊन एकूण तीन गडी बाद केले. काईल जेमीसन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाला.

राजस्थान रॉयल्सची सुमार फलंदाजी ही या सामन्यातही कायम राहिली. कर्णधार संजू सॅमसनची मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. पण शिवम दुबे ( 46 धावा, 32चेंडूत पाच चौकार, दोन षटकार) आणि रायन पराग (25 धावा, 16 चेंडू, चार चौकार) यांनी पाचव्या विकेटसाठी 39 चेंडूंत 66 धावा केल्याने संघाला सन्माननीय धावसंख्या गाठता आली. शेवटी राहुल तेवतियाने 23 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह 40 धावांचे योगदान दिले.

पडिक्कल आणि कोहली यांच्यात पहिल्या विकेटसाठी 181 धावांची भागीदारी ही लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठी भागीदारी होती. 16.3 षटकांत 181 धावा करुन संघाने विजय मिळविला. संघाने चारही सामन्यांतून आठ गुण जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. डावाच्या पहिल्याच षटकात कोहलीने लेगस्पिनर श्रेयस गोपालला षटकार मारुन मोठा डाव खेळण्याचा इरादा व्यक्त केला होता. या भागीदारीत त्याने पडिक्कलला आक्रमक खेळण्याची संधी दिली.

बंगळुरु

आयपीएलमधील पडिक्कलचे हे पहिले शतक असून त्यासाठी त्याने 52 चेंडूंचा सामना केला आणि 11 चौकार व 6 षटकार ठोकले. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा तो तिसरा तरुण फलंदाज आहे. पण लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो सर्वात लहान आहे. या कामगिरीबद्दल 20 वर्षीय खेळाडूला सामनावीर म्हणून निवडले गेले.

 तसेच आरसीबीचे हे 14 वे शतक होते जे आयपीएलच्या कोणत्याही फ्रँचायझीमधील सर्वोच्च शतकदेखील आहे.

मागील सामन्यातही राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी दमदार कामगिरीने केली होती, पण त्यांच्या गोलंदाजांची कामगिरी तितकी चांगली नव्हती. पण या सामन्यात कोणताही गोलंदाज एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर पोहोचला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here