आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का: ‘यॉर्करकिंग’ आयपीएल स्पर्धेतून पडला बाहेर; जाणून घ्या काय कारण


 

सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मधून बाहेर पडला आहे.  गुडघा दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही.  सनरायझर्स हैदराबादसाठी हा मोठा धक्का आहे. आयपीएल 2021 मध्ये नटराजनने फक्त दोन सामने खेळले.

त्याने आपला शेवटचा सामना 11 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला. या आयपीएलमध्ये संघाची कामगिरी चांगली राहिली नाही. हैदराबादने आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी एक विजय आणि तीन सामने गमावले आहेत.

गुरुवारी टी नटराजन स्पर्धेतून बाहेर पडला असल्याची माहिती सनरायझर्स हैदराबादच्या सूत्रांनी दिली. पंजाब किंग्ज विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने नऊ गडी राखून विजय मिळविला. पंजाब किंग्जबरोबरच्या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने दुखापतीबाबत माहिती दिली.

सनरायजर्स हैदराबाद

नटराजन याला गुडघा दुखापत झाल्याचे त्याने म्हटले होते. अशा परिस्थितीत बायो बबल दरम्यान ते स्कॅनसाठी गेले तर त्यांना सात दिवस बाहेर बसवावे लागेल. त्याला परत क्वारंटाइन मध्ये रहावे लागेल.

तो पुढे म्हणाला की, ‘आम्ही त्याच्या दुखापतीवर नजर ठेवत आहोत. नटराजनला इंग्लंडविरुद्ध चार टी -20 सामनेदेखील खेळता आले नाहीत. पाचव्या टी -20 सामन्यात तो संघात परतला.’ नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये गुडघ्याच्या उपचारानंतर तो संघात सामील झाला. रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या पुढील सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here