आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

आयपीएलमध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू


 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे. या प्रसिद्ध टी -20 लीगमध्ये 6 हजार धावा करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक ठोकत विराटने ही कामगिरी केली.

विराटने 196 सामन्यांच्या 188 व्या डावात ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये कोहलीने आतापर्यंत 40 अर्धशतके आणि 5 शतके ठोकली आहेत. यावेळी, त्याचा 38 चा स्ट्राईक रेट 130 आहे. त्याच्या नावावर 518 चौकार आणि 204 षटकारही आहेत.

कोहलीसामन्याबद्दल बोलायचे झाले तर, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने 47 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी खेळली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. विराटचे या मोसमातील हे पहिले अर्धशतक होते. राजस्थानच्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटनेही देवदत्त पडिक्कल याच्यासमवेत पहिल्या विकेटसाठी 181 धावांची अखंड भागीदारी केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने विराट आणि पडीकक्कलच्या शानदार डावामुळे मोसमातील सलग चौथा विजय मिळवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले. आरसीबी हा आतापर्यंतचा एकमेव संघ आहे ज्यांनी एकही सामना गमावला नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here