आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सोलापुरातील चाहत्यांनी जपल्या तेंडुलकरांच्या आठवणी

निवृत्त होऊनही सचिन यांची क्रेझ कायम


 

आपल्या कारकिर्दीत नव्वदीच्या दशकात भल्याभल्या गोलंदाजाला घाम फोडणारे भारताचे माजी खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले. त्यांच्या संयमी आणि विनयशील स्वभावामुळे ते करोडो क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातले ताईत बनले आहे. ते आज जरी क्रिकेटमधून निवृत्त झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांशी नाळ त्यांनी कधी तोडली नाही. तसेच चाहत्यांमध्ये आजही त्यांची क्रेझ कायम आहे. सोलापुरातील काही चाहत्यांनी सचिनच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

सचिन

आज सचिन यांचा ४८ वाढदिवस. त्यानिमित्ताने सचिन यांच्या चाहत्यांनी जपून ठेवलेल्या आठवणींवर टाकलेला हा प्रकाश. सोलापूर शहरातील भवानी पेठ परिसरात राहणारे सचिन कृष्णानंद अणवेकर हे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे खूप मोठे फॅन आहेत. व्यवसायाने सराफ असलेले सचिन अणवेकर यांनी आपला चाहता खेळाडू  सचिन तेंडुलकर यांना प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा देणारे पत्र लिहितात. पत्र मिळताच तेंडुलकर यांचे स्वीय साहाय्यक शुभेच्छा पत्र पाठवल्याबद्दल फोन करून सचिनच्यावतीने चाहत्याचे आभारही मानतात. त्यांचा हा फोन चाहत्यामध्ये उत्साह भरणार ठरतो.

मागील वर्षी श्री. अणवेकर यांच्या पत्राला उत्तर देत सचिन यांनी एक भेटवस्तू देखील पाठवली आहे. सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन सर्वोत्तम क्षणचे कोलॅज केलेले फोटो स्वतःच्या स्वाक्षरीने पाठवून दिले आहेत. सचिनने शंभरावे शतक ठोकल्यानंतर चा क्षण आणि २०११ च्या विश्वचषका सोबतचा फोटो पत्रासोबत पाठवले आहे. हे दोन्ही क्षण सचिन यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम असल्याचे पत्रात सांगितले आहे. आपल्या चाहत्या खेळाडूने पाठवलेली अनोखी भेट श्री. अणवेकर यांनी आजही जपून ठेवली आहे.

 

पोस्ट तिकिटांवर सचिन यांचा फोटो

क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर हे जागतिक क्रिकेटमध्ये २०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणारे जगातील एकमेव आणि पहिले खेळाडू आहेत. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भारतीय पोस्ट विभागाने त्यांच्या सन्मानार्थ पोस्ट तिकीट काढले होते. हे तिकीट १४ नोव्हेंबर २०१३ साली प्रसिद्ध केले होते. तिकीट अनावरणाच्या दिवशी ‘फर्स्ट डे फर्स्ट कव्हर’ देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. हे तिकीट आणि ‘फर्स्ट डे फर्स्ट कव्हर’ घेण्याचा मान बार्शी येथील उदयकुमार पोतदार यांना मिळाला होता. सचिन यांची ही अविस्मरणीय आठवण त्यांनी आपल्या पोस्ट तिकिट संग्रहात जपून ठेवली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here