आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

बापरे किती खतरनाक बाऊन्सर! पदार्पणाच्या सामन्यात ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाने फलंदाजांचे तोडले हेल्मेट.


 

पाकिस्तान क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटला एकापेक्षा एक धुरंधर आणि खतरनाक गोलंदाज जागतिक क्रिकेटला दिले आहेत. पाकिस्तानला गोलंदाजाची खाण मानली जाते.

नव्वदीच्या दशकात इम्रान खान वसीम अक्रम वकार युनिस अब्दुल कादीर त्यानंतर शोएब अख्तर मोहम्मद युसूफ यासारख्या गोलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजांवर आपला धाक निर्माण केला होता. दिग्गज गोलंदाज निवृत्त झाले तरी नवे गोलंदाज आपली छाप सोडत आहेत. नुकताच झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात याचा अनुभव पाहायला मिळाला.

अरशद इक्बाल पाकिस्तानचा हा युवा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच खळबळ माजवली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी -20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर 20 वर्षीय अरशदने बाऊन्सर फेकला आणि स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या हेल्मेटचे दोन तुकड्यांमध्ये रुपांतर केले. या बाउन्सरने फलंदाजाच्या मनात भीती निर्माण केली होती.

पाकिस्तानी गोलंदाज

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी -20 सामन्यात त्याच्या दुसर्‍या षटकात अरशदने बाऊन्सरच्या सहाय्याने फलंदाजाच्या हेल्मेटचा वरचा भाग फेकला. तथापि, हा धाक असूनही झिम्बाब्वेने दुसरा टी -20 सामना जिंकण्यात यश मिळविले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला 119 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 99 धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेला मागील 16 सामन्यानंतर पाकिस्तानवर हा पहिला टी -20 विजय मिळवला आहे.

अरशदच्या धोकादायक बाउन्सरचा सामना तिनाशे कमुनुखमुवेने केला. बॉलने त्याच्या हेल्मेटला इतक्या जोरात धडक दिली की, हेल्मेटचे दोन तुकडे झाले. हेल्मेटचा वरचा भाग खाली कोसळला. यानंतर पाकिस्ताचा संघ या फलंदाजाला पाहण्यासाठी जवळ पोहोचला. यानंतरही त्याने फलंदाजी केली आणि 40 चेंडूंत 34 धावा केल्या. त्यानंतर लवकरच अरशदला त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय विकेट मिळाला. तडिवनाशे मरुमनी त्याचा बळी ठरला. मरुमनीने 13 धावा केल्या होत्या.

झिम्बाब्वेने निर्धारित 20 षटकात 9 बाद 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान 99 धावांवर बाद झाला. बाबर आझमने सर्वाधिक 41 धावा केल्या. एका वेळी पाकिस्तानची धावसंख्या 3 गडी राखून 78 धावा होती. परंतु झिम्बाब्वे संघाने लक्ष्य वाचविण्यात यश मिळविले आणि 19 धावांनी सामना जिंकून मालिकेत 1-1अशी बरोबरी साधली. टी 20 क्रिकेटमधील दोन वर्षांत झिम्बाब्वेचा हा पहिला विजय आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा:जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here