आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

फुटपाथवर पकोडे विकणारा बिहारी अग्रवाल आज करोडपती ज्वेलर्स बनलाय….!


 

चांद बिहारी अग्रवाल यांचा जन्म जयपुर मध्ये झाला होता. परिवारामध्ये आई-वडील आणि पाच बहीण-भाऊ होते. त्यांच्या वडिलांना सट्टेबाजी आणि जुवा खेळण्याचे व्यसन लागले होते त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या आर्थिक स्थिती बिघडली आणि लहानपणीच त्यांना शिक्षण सोडून द्यावे लागले.

चांद बिहारी अग्रवाल यांच्या जीवनातील संघर्षाची कहाणी.

चांद बिहारी यांनी आपल्या परिवाराची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे आपल्या आई आणि भावासोबत वयाच्या दहाव्या वर्षी रस्त्याच्या कडेला गाड्यावर पकोडे विकण्याचे काम सुरु केले जिथे ते लगातार 12 ते 14 घंटे काम करत असत. ज्यामुळे परिवाराचे पालन पोषण होईल एवढी कमाई होत असे. नंतर वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी जयपूर मधील एका साडीच्या दुकानावर तीनशे रुपये महिना पगारावर सेल्समन म्हणून नोकरी केली.

चांद बिहारी अग्रवाल

चांद बिहारी अग्रवाल यांच्या द्वारा पटना मध्ये साड्यांचा व्यवसाय करण्याची कहाणी

चांद बिहारी अग्रवाल यांनी जीवनामध्ये काहीतरी मोठे करण्यासाठी आपल्या मोठ्या भावाच्या लग्नात उपहार स्वरूप मिळालेले पाच हजार रुपये घेऊन त्यापासून 18 चंदौसी साड्या घेतल्या आणि पटना येथे जाऊन जयपुरी चंदौसी साड्या प्रत्येक दुकानदाराला दाखवण्यास सुरुवात केली.

त्यांचे काम चांगले चालायला लागले आणि काही वेळातच जयपुर वरून पाटणला नेउन विकण्याऐवजी पाटणाला रेल्वे स्टेशनच्या बाजूला फुटपाथवरच भावासोबत साड्या विकण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा व्यापार चालायला लागला आणि पाटणा मधील सगळेच व्यापारी त्यांच्याकडून मला घ्यायला लागले  त्यानंतर त्यांनी एक दुकाने किरायाने घेतली.

सगळं काही व्यवस्थित चालू होते पण अचानक एके दिवशी त्यांच्या दुकानात चोरी झाली आणि चोर त्यांच्या दुकानातून लाख रुपये घेऊन आणि साड्या घेऊन पसार झाली. यामुळे त्यांनी कमावलेले सगळे पैसे चोरीला गेले आणि ते पुन्हा एकदा कंगाल झाले.

यानंतर मोठ्या भावाने साड्यांचे दुकान बंद केल्यावर अजून त्यांच्या परिवाराचे आर्थिक परिस्थिती बिघडली.

चांद बिहारी अग्रवाल यांच्याद्वारा पटना मध्ये दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्याची कहाणी

चांद बिहारी अग्रवाल

चांद बिहारी यांनी एवढं होऊनही हार मानली नाही आणि आपल्या मोठ्या भावाकडे 50 हजार रुपयांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार दागिन्यांचे दुकान सुरू केली. आपला व्यवसाय चांगला चालण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि लवकरच पटना मधील 500 ज्वेलर्स दुकानदाराशी  संपर्क साधून जवळपास दहा लाख रुपयांचे दागिने विक्री केले. आणि त्यामधून मिळालेल्या पैश्यामधून 1988 मध्ये सोन्याच्या व्यवसायामध्ये उतरले.

हळूहळू त्यांनी आपले क्वालिटी आणि विश्वासाच्या जीवावर आपला व्यवसाय यूपी आणि बिहारमध्ये पसरवला. यानंतर 2002 मध्ये पटना मध्ये चांद बिहारी अग्रवाल ज्वेलर्स नावाने एक छोटेसे दागिन्यांचे दुकान सुरू केली जे आज एका खूप मोठ्या कंपनीमध्ये बदललेले आहे.

आज त्यांच्या व्यवसायाचा टर्नओव्हर दहा लाख करोड रुपये एवढा आहे. त्यांना वर्ष 2015 मध्ये ऑल इंडिया बिझनेस अंड कमुनिटी फाउंडेशन द्वारा सिंगापूर मध्ये सन्मानित करण्यात आले. हे सगळं शक्य झाले त्यांच्या मेहनतीमुळे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here