आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

सुभाष गोपीनाथ संस्थापक, ग्लोबल इंक चे सीईओ आणि अध्यक्ष यांच्या यशाची कहाणी


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये ग्लोबल इंक सीईओ सुभाष गोपीनाथ यांच्या यशाची कहाणी सांगणार आहोत. ज्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ग्लोबल इंक नावाची कंपनी सुरू करून पूर्ण जगामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला होता. साधारण लोकांची जीवनामध्ये वय ते असते ज्यामध्ये ते करिअरचा विचार न करता मौजमजेत आपले दिवस घालवत असतात. परंतु सुहास गोपीनाथ ह्यांचे विचार या वयामध्ये खूपच वेगळे होते. आज पर्यंत सगळ्यात कमी वयामध्ये सीईओ बनण्याचा किताब त्यांच्याच नावे आहे.

कंपनी

 

सुभाष गोपीनाथ यांच्या लहानपणीची कहाणी

सुभाष गोपीनाथ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1986 ला कर्नाटक राज्यातील बेंगलोर मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला .त्यांचे वडील एम.आर. गोपीनाथ भारतीय सैन्यामध्ये एक सुरक्षा वैज्ञानिक या पदावर कार्यरत होते आणि आई कला गोपीनाथ ह्या घर सांभाळत होत्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बेंगलोर मधील एअर फॉर्स स्कूल मध्ये झाले. त्यांना लहानपणापासून जीव जंतू आणि वेटनरी सायन्स मध्ये रस होता. त्यावेळी भारतामध्ये कम्प्युटरचा वापर सुरू झाला होता त्यामुळे त्यांना याविषयी आवड निर्माण झाली आणि ते याविषयी जास्त माहिती शोधत होते.

new google

 

सुभाष गोपीनाथ आपल्या शाळेतील मित्रांच्या दिवसभर कॅम्पुटर वापरामुळे आणि कॅम्पुटर विषयी गप्पागोष्टीमुळे कॅम्पुटर शिकण्याचे मन बनवले होते. परंतु समस्या ही होती की त्यांच्या घरी कम्प्युटर नव्हता. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी घरा जवळील एका इंटरनेट कॅफेमध्ये जाण्यास सुरुवात केली. परंतु अजून एक समस्या होती की रोज इंटरनेट कॅफे का किराया द्यायचा कुठून गोपीनाथ यांच्यापाशी तर एवढे पैसे नव्हते. यासाठी मालकासोबत त्यांनी बोलणी केली आणि रोज फ्री मध्ये काँप्यूटर चालवण्याच्या बदल्यात 1 ते 3 यावेळेत नेट कॅफे चालवण्याचे काम सुरू केले.

 13 वर्ष वय असताना स्वतःच्या पायावर उभे राहिले.

आता कॅफेमध्ये सुभाष गोपीनाथ यांनी दिवस-रात्र वेबसाइट बनविण्याची शिकण्याचे काम सुरू केले आणि हळूहळू त्यांना ते जमायला लागले . सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपले रजिस्ट्रेशन फ्रीलान्स वेब डिझायनर म्हणून करून घेतले. नंतर आपल्या पहिल्या क्लाइंटची वेबसाईट फ्री मध्ये बनवली. यानंतर लवकरच अजून काही क्लाइंट चा वेबसाईट बनविण्याचे काम त्यांना भेटले त्यामधून त्यांना $100 मिळाले. यामधून त्यांनी स्वतःचे कॅम्पुटर इंटरनेट कनेक्शन सोबत घेतले.

बघूया सुभाष गोपीनाथ द्वारा अमेरिका बेस्ड कंपनीची नोकरीची ऑफर सोडण्याची कहाणी

लवकरच सुभाष गोपीनाथ यांच्या टायलेंटची चर्चा देश आणि विदेशात होऊ लागली. यामुळे नोकरी संबंधित त्यांना खूप सारे ऑफर येऊ लागल्या. त्यांना अमेरिकेतील एक खूप मोठी आयटी कंपनी मधून नोकरीची ऑफर आली जी अमेरिकेमध्ये त्यांच्या पार्टटाईम नोकरी सोबत त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायला हि तयार होती. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये बिलगेट सारखे स्वतःचे काही मोठे करण्याचे स्वप्न होते त्यामुळे त्यांनी ती ऑफर सोडून दिली.

कंपनी

 सुभाष गोपीनाथ द्वारा 14 वर्षे वय असताना स्वतःची कंपनी ग्लोबल इंक सुरू करण्याची कहाणी

सुभाष गोपीनाथ यांनी काहीतरी मोठे करण्यासाठी लवकरच 14 वर्षे वय असताना आपली कंपनी ग्लोबल इंक स्टार्टअप सुरू केली. सुरुवातीला ते या कंपनीचे नाव ग्लोबल किंवा ग्लोबल सोल्युशन्स ठेवणार होते. परंतु भारतामध्ये एक तर त्यांचे वय कमी असल्यामुळे त्यांना कंपनी खोलण्याचा अधिकार नव्‍हता दुसरे भारतामध्ये या दोन्ही नावांचा कंपन्या रजिस्ट्रेशन साठी उपलब्ध नव्हत्या. यासाठी त्यांनी 2000 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जाऊन आपली कंपनी ग्लोबल इंक नावाने रजिस्ट्रेशन केले कारण अमेरिकेतील कानून अनुसार तेथे फक्त पंधरा मिनिटांमध्ये कंपनीचे रजिस्ट्रेशन होते. आपल्या कंपनीचे ते स्वतः मालक आणि सीईओ बनले आणि अमेरिकेतील त्यांचा एक मित्र कंपनीचा बोर्ड ऑफ मेंबर बनला.

 

सुभाष गोपीनाथ यांनी अमेरिकेमध्ये ग्लोबल इंक नावाने कंपनीचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर भारतामध्ये सुद्धा त्याच नावाने कंपनीचे रजिस्ट्रेशन केले. त्यांची कंपनी वेब सोल्युशनस मोबाईल, सोल्युशनस आणि त्यांच्याशी जोडलेला रिसर्च डाटा मार्केटला उपलब्ध करून देते. हे त्यांच्या मेहनत सातत्य आणि इंटेलिजन्स यांचा परिणाम होता की त्यांच्या कंपनीला पहिल्याच वर्षी एक लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी पाच लाख रुपये चा टर्नओवर प्राप्त झाला.

आज सुभाष गोपीनाथ यांच्या या कंपनीची ब्रांच शाखा स्पेन,अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, ब्रिटन सहित खूप देशांमध्ये पसरले आहेत. ज्याला बघून त्यांना आणि त्यांच्या परीवाराला याचा खूप अभिमान वाटतो आणि आनंदही मिळतो. आपल्या लहान वयात केलेल्या या कारणांमुळे त्यांना खूप सारे राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर येतोय चित्रपट. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here