आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

तुम्ही टीव्हीवर एमडीएस मसाल्यांच्या ॲड मध्ये एका वयस्कर व्यक्तीला पाहिले असेल ती व्यक्ति दुसरी कोनी नसुन एमडीएच मसाला फाउंडर धर्मपाल गुलाटी आहे. जे 2020 पर्यंत 25 करोड पेक्षा जास्त वेतन मिळवणारे भारतातील एफएमसीजी मध्ये सगळ्यात जास्त वेतन मिळवणारी सीईओ होते.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला त्यांची कहाणी सांगणार आहोत ज्यांना पूर्ण विश्वामध्ये मसाला किंग किंवा मसाल्यांचे बादशहा म्हणून ओळखले जाते.

धर्मपाल गुलाटी

धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 ला ब्रिटिश शासित पाकिस्तानमधील सियालकोट मध्ये झाला जो पूर्वी भारताचा हिस्सा होता. त्यांचे वडील चुन्‍नीलाल गुलाटी आणि आई चांदेवि आर्य समाजाचे अनुयायी होते. त्यांच्या वडिलांची सियालकोट मध्ये Mahasian Di Hatti ( MDH) नावाने मिर्च मसाल्यांची प्रसिद्ध दुकान होती ज्याची स्थापना त्यांच्या वडिलांनी 1919 मध्ये केली होती. त्यांचे वडील आपल्या हातानेच मिरची मसाले बनवत होते ज्यामुळे पूर्ण क्षेत्रामध्ये त्यांना तिखी  मिरची मसाले वाले या नावाने ओळखले जात होते.

धर्मपाल गुलाटी यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कहाणी

धर्मपाल गुलाटी यांचा शिक्षणामध्ये रस नव्हता त्यामुळे त्यांनी 1933 मध्ये पाचवी उत्तीर्ण करून शिक्षण सोडून दिले त्यामुळे त्यांच्या वडिलांना खूप दुःख झाले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांनी जीवनात काहीतरी करावे यासाठी त्यांना एका सुताराकडे कामास ठेवले  तिथे सहा महिने कामास गेले आणि नंतर तेथेही कामास जाने बंद केले.

नंतर त्यांनी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये, हार्डवेअरच्या दुकानांमध्ये काम केले पण त्यांचे कुठेही मन लागले नाही. काही वेळेनंतर त्यांनी स्वतःची मसाल्याचे दुकान सुरू केली. नंतर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी दुकान चालविण्यास सुरुवात केली.

 

असं म्हणतात की जीवनातील वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. असेच काही धर्मपाल गुलाटी आणि त्यांच्या परिवारासोबत झाली जेव्हा भारताचे 1947 मध्ये विभाजन झाले. ज्या सियालकोट मध्ये लहानपणापासून त्यांचा वेळ गेला होता ते सियालकोट आता पाकिस्तानचा हिस्सा बनले होते.

यानंतर ते सगळे काही सोडून आपल्या परिवारासोबत भारतामध्ये आले. कसेबसे दंगे आणि कत्लेआम टाळून त्यांचा परिवार 7 सप्टेंबर 1947 ला अमृतसर मधील कॅम्पमध्ये पोहोचला. काही दिवस कॅम्पमध्ये राहिल्यानंतर 27 सप्टेंबर 1947 लाते आपल्या मेहुण्या सोबत काम शोधण्यासाठी दिल्लीला निघाले आणि करोल बाग येथे त्यांच्या भाचीच्या फ्लॅटवर राहिले.

आता वेळ होती दिल्लीमध्ये काम करण्याची यासाठी त्यांनी आपल्या जवळील 1500 रुपये जमा रकमेपैकी 650 रुपये खर्च करून एक घोडा आणि टांगा घेतला. या टांग्यातून ते न्यू स्टेशन दिल्ली पासून कुतुब रोड आणि करोल बाग पासून हिंदू रोड पर्यंत प्रतिव्यक्ती दोन रुपये शुल्क प्रमाणे चालवण्यास सुरुवात केली. पण यावरून एवढी कमाई होत नसे की त्यांच्या परिवाराचे पालन पोषण होईल काही काही दिवस तर त्यांना एकही सवारी भेटत नसे. एवढेच नाही तर लोक त्यांच्यावर हसत आणि त्यांचा मजाकही उडवत. शेवटी दोन महिने टांगा चालवून तोही बंद करण्यात आला.

 

शेवटी धर्मपाल गुलाटी यांनी आपला खानदानी मसाल्यांचा व्यवसाय दिल्लीमध्ये सुरू करण्याचा विचार केला. यासाठी आपला घोडा आणि टांगा विकून अजमल खान रोड करोल बाग येथे एक लाकडाची टपरी घेऊन Mahashian Di Hatti Siyalkot MDH नावाने दुकान सुरू केली. येथे  दिवस रात्र काम करून करून मसाला बनविण्याचे काम सुरू केले आणि त्यांच्या मेहनतीचे  फळ भेटण्यास सुरुवात झाली.

मसाल्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांचे दुकान चालायला लागली आणि घराची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारली. आपली आर्थिक परिस्थिती अजून सुधारण्यासाठी 1953 मध्ये अजून एक दुकान त्यांनी चांदणी चौक मध्ये सुरू केली. 1959 मध्ये दिल्लीमधील किर्ती नगर येथे एमडीएच नावाने मसाल्यांची फॅक्टरी सुरू केली.

हळूहळू वर्तमानपत्रांमधून दिलेल्या बातम्यांमुळे त्यांच्या मसाल्यांच्या गोष्टी सगळीकडे पसरत गेल्या आणि त्यांचा व्यापार देश-विदेशात वाढत गेला.आजच्या वेळेत एमडीएच मसाल्यांचा असा ब्रान्ड बनलेला आहे जो भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये वापरले जातो.

धर्मपाल गुलाटी

एम डी एच मसाले जगातील  100 पेक्षा जास्त देशांमध्ये आपले 60 पेक्षा जास्त मसाले एक्सपोर्ट करतो.

एम डी एच मसाले फाउंडर धर्मपाल गुलाटी यांच्या जीवनाशी जोडलेल्या अन्य काही गोष्टी

धर्मपाल गुलाटी एमडीएच मसाल्यांचे स्वतः प्रबंध निर्देशक आणि ब्रँड अँबेसिडर होते.

धर्मपाल गुलाटी एक व्यवसायिक असण्यासोबतच एक समाजसेवक सुद्धा होते त्यांनी खूप सारे दवाखाने आणि शाळा सुरू केल्या.

धर्मपाल गुलाटी यांचे घराणे आज देशातील टॉप घराण्यांपैकी एक आहे.

धर्मपाल गुलाटी यांचे निधन 3 डिसेंबर 2020 ला झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोणापासून नीट झाल्यानंतर हार्ट अटॅक ने त्यांचा मृत्यू झाला.

व्यापार आणि उद्योगांमध्ये चांगले कार्य केल्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.

98 वर्षांचे धर्मपाल गुलाटी आपल्या मसाल्यांचे विज्ञापन स्वतः करत होते. ते त्यांच्या कंपनीचे सीईओ होते आणि त्यांची सॅलरी 25 करोड होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here