आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर  सहा गडी राखून  विजय:  ख्रिस मॉरिस संजू सॅमसन ठरले हीरो


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 9 गडी गमावून 133 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने 36 आणि दिनेश कार्तिकने 25 धावा केल्या.

ख्रिस मॉरिसने शानदार गोलंदाजी करत त्याच्या चार षटकांत केवळ 23 धावा देऊन 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनच्या नाबाद 42 धावांच्या खेळीच्या जोरावर 18.5 षटकांत 134 धावांचे लक्ष्य गाठले.  राजस्थानचा हा मोसमातील दुसरा विजय आहे, तर केकेआरला त्यांचा सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला आहे.

राजस्थान रॉयल्स

134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सुरुवात मिळाली नव्हती आणि चौथ्या षटकात जोस बटलर (5) च्या रुपात संघाने आपली पहिली विकेट गमावली. यानंतर, यशस्वी जयस्वाल, आयपीएल 2021 मध्ये पहिला सामना खेळत होता, तो 22 धावा काढून शिवम मावीचा बळी ठरला.

 

कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे (22) यांनी तिसर्‍या विकेटसाठी आणखी 45 जोडले आणि संघाला मजबूत स्थितीत नेले.  दुबे वरुण चक्रवर्तीचा दुसरा बळी ठरला. डेव्हिड मिलरच्या वर राहुल तेवतियाला संधी मिळाली, परंतु त्याला काही खास कामगिरी करता आली नाही आणि तो (5) धावांवर बाद झाला.  डेव्हिड मिलर (24 ) आणि सॅमसन यांनी यापुढे संघाची आणखी बळी पडू दिली नाहीत आणि सामना 6 विकेट्सने जिंकला.

 

यापूर्वी या सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांची खराब कामगिरीही सुरूच होती. सलामीवीर शुभमन गिल (11) आणि नितीश राणा (22) यांनी संथ गतीने सुरुवात केली. शुभमन त्याच्या खेळी दरम्यान बराचवेळ धावांसाठी झगडत असल्याचे दिसून आले. धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.  यानंतर राणा ही चेतन साकारियाच्या चेंडूवर बाद झाला. राहुल त्रिपाठी (36) यांनी एक बाजू लावून धरत चांगली फटकेबाजी केली पण त्याला इतर फलंदाजांचा पाठिंबा मिळाला नाही.

राजस्थान रॉयल्स

सुनील नारायण (6), आंद्रे रसेल (9) काही खास कामगिरी करू शकले नाहीत. दिनेश कार्तिकने 25 धावा फटकावल्या, पण पॅट कमिन्स (10) आणि कार्तिकने एका षटकात मॉरिसच्या चेंडूवर बाद झाल्याने केकेआरचे कंबरडे मोडले. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने 4 षटकांत केवळ 23 धावा देऊन चार गडी बाद केले तर चेतन साकारिया आणि जयदेव उनाडकट यांनी कसून गोलंदाजी करत प्रत्येकी एक गडी बाद केला.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here