आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

सर रवींद्र जडेजाने ‘या’ गोलंदाजाची काढली पिसं: ठोकल्या तब्बल एकाच षटकात विक्रमी 37 धावा


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021च्या 19 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सुरु आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 191 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात चौकार आणि षटकारांसह पाऊस पाडला. त्याने या षटकात 5 षटकार आणि एक चौकार ठोकला. यासह हर्षलनेही नो बॉल फेकला, त्यावर जडेजाने षटकार ठोकला.

19 षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या 4 विकेट्ससाठी 154 धावा झाल्या होत्या. अशा परिस्थितीत चेन्नईचा संघ जास्तीत जास्त 170 धावांनी पोहोचेल असं वाटत होतं. पण 20 व्या षटकात हर्षलच्या पहिल्या दोन चेंडूंवर जडेजाने मिडविकेटला षटकार लगावला. तिसरा चेंडू हर्षलने फुलटॉस टाकला आणि पंचांनी त्यास नो बॉल दिला. जडेजानेही या चेंडूला सीमारेषा बाहेर पाठवले. म्हणजेच पहिल्या दोन चेंडूंवर 19 धावा झाल्या.

वींद्र जडेजा

पुढच्या चेंडूवर जडेजाने पुन्हा हर्षल पटेलला षटकार ठोकला. अशाप्रकारे जडेजाने 4 चेंडूत 4 षटकार ठोकले होते. यातील एक नोबोलदेखील होता. चौथ्या बॉलवर जडेजाने दोन धावा घेतल्या.

पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला. अशा प्रकारे अखेरच्या षटकात हर्षल पटेलने एकूण 37 धावा दिल्या. त्याने सामन्यात 4 षटकांत 51 धावा देऊन 3 बळी घेतले. सीएसकेने 20 षटकांत 4 गडी गमावून 191 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

आयपीएलमध्ये यापूर्वी ख्रिस गेलने 2011 मध्ये बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर कोची टस्कर्सविरुद्ध प्रशांत परमेश्वरनच्या षटकात तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. हर्षल पटेलने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग 20 वे षटक टाकले. हर्षलने सुमार गोलंदाजी केली ज्याचा जडेजाने पुरेपूर फायदा घेतला.

 

जडेजाने अवघ्या 28 चेंडूत 62 चेंडूत 4 चौकार आणि 5 लांब षटकार ठोकले. ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीविरुद्ध 4 गडी गमावून 191 धावा केल्या. जडेजा व्यतिरिक्त फाफ डुप्लेसिसनेही 50 धावांची शानदार खेळी साकारली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here