आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कपड्यापासून थैली शिवणाऱ्या या उद्योजकाने भारतातील सर्वांत मोठी हेल्मेटची कंपनी बनवलीय…


 

सुभाष कपूर जेंव्हा लहान होते तेव्हा 25 पैशाच्या नफ्यावर थैल्या शिवण्याचे काम करत होते. आज 73 वर्षे वय असताना सुरू केलेली त्यांची कंपनी स्टील बर्ड हायटेक इंडिया आता पब्लिक लिमिटेड कंपनी बनली आहे आणि हेल्मेट निर्माण करण्याच्या कामामध्ये अग्रेसर आहे. कंपनी वार्षिक 200 करोड रुपयांचा व्यवसाय करत आहे.

आपल्या जिवनामध्ये त्यांनी खूप सार्‍या व्यवसायांमध्ये हात आजमावला आहे. लहान वयातच कपड्यांचे थैल्या शिवल्या. नंतर तरुण वयामध्ये ऑइल फिल्टर बनवायला लागले . शेवटी हेल्मेट बनवण्याच्या जगामध्ये त्यांनी पाऊल ठेवले त्यांनी फायबर ग्लास प्रोटेक्शन गिअर बनवण्याचा प्रयत्न केला.

new google

हेल्मेट
सुभाष आता स्टीलबर्ड चे चेअरमन आहेत. मागच्या चार दशकांमध्ये त्यांनी आठ हेल्मेट निर्माण कंपनीचे कार्य सुरू केले आहे. याची सुरुवात 1976 मध्ये कंपनीचे हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्हा आणि दिल्लीमध्येतीन आणि नोएडामध्ये दोन प्लांट आहेत.

1700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्यांची कंपनी रोज 9 हजार ते 10 हजार हेल्मेट आणि त्याच्याशी संबंधित साहित्य बनवण्याचे काम करते.

या उत्पादनांची किंमत 900 रुपये ते पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे. साल 1996मध्ये स्टील बर्ड आणि इटलीतील सगळ्यात मोठी हेल्मेट कंपनी बीयफेसोबत करार झाला. जवळपास चार हजार प्रकारची हेल्मेट बनवण्याचे उत्पादन श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपा , ब्राझिल, मॉरिशस आणि इटलीला निर्यात होतात.

सगळे त्या व्यक्तीच्या सुरुवातीचे परिणाम आहे ज्याने कधी शाळेमध्ये 33 टक्के मार्क घेतले नव्हते. सुभाष कपूर स्वतःला एक साधारण व्यक्ती समजतात ज्याने स्वतःला केलेले  वादे पूर्ण केले.

जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवनिबद्दल सुभाष सांगतात खूप वेळ आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत असे. त्यांचा परिवार झेलम जिल्ह्यातील सध्याच्या पाकिस्तानमधील पिंड दन खाणचा चौथा स्तंभ होता, परंतु वाटाघाटीने आम्हाला उद्ध्वस्त केले.

सुभाष यांचा प्रतिष्ठित परिवार 26 प्रकारच्या व्यवसायांमध्ये जोडलेला होता यामध्ये भांडे कपडे दागिने आणि शेती यांचा संबंध होता. त्यांच्या शेतात तेरा विहिरी होत्या. विहीर तीस-चाळीस एकर शेतीचे सिंचन करत होती. 1903 मध्ये काश्मीर चा पहिला पेट्रोल पंप सुभाष यांच्या परदादाने सुरू केला होता.

वेळ बदलली आणि फाळणीमुळे या समृद्ध परिवाराला रस्त्यावर यावे लागले.

1947 मध्ये त्यांची आई लीलावती आपल्या चार मुलांसोबत सुरज, सतीश, कैलाश आणि दीड वर्षाचा सुभाष यांच्यासोबत हरिद्वार तीर्थ करण्यासाठी आली होती तेव्हाच फाळणीची घोषणा झाली. आमच्यापाशी मुलांसोबत हरिद्वारमध्ये राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. यावेळी त्यांचे पती तिलक राज कपूर पाकिस्तान मध्ये होते.

जीव वाचवून त्यांचे वडील कसेबसे भारतामध्ये पोहोचले. मात्र दुसऱ्या हिंदू लोकांसोबत एका ट्रकमध्ये भारतात येण्यासाठी चढले रस्त्यामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये खूप लोक मारले गेले. त्यांचे वडील आणि काही नशीबवान लोकच यातून वाचले.
भारतामध्ये त्यांचा परिवार एकत्र तर आला परंतु जीवन जगण्यासाठी काही साधन नव्हते.

त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकले आणि मीठ पैक करण्यासाठी छोट्या थैल्या बनवण्याचे काम सुरू केले.
सुभाष सांगतात त्यांनी आपल्या कंपनीचे नाव कपूर थैली हाउस ठेवले. परिवाराने एक किलो किंवा दोन किलो या हिशेबाने थैल्या शिवण्याचे काम सुरू केले. प्रत्येक पैक मधे 100 थैल्या असत. रातोरात ह्या थैल्या प्रसिद्ध झाल्या.

सुभाष यांचे काम कपडा कापणे होते, शिवाय ते थैली  पॅक करणे आणि त्याच्यावर प्रिंटिंग करणे हे काम करत होते.

अजूनही 1959 ते 60 मध्ये दिलेली मॅट्रिकची परीक्षा त्यांना आठवते. त्याबद्दल ते सांगतात की, परीक्षेला जाण्याअगोदर कपडे कापण्याचे काम मला करावे लागत असे. त्या दिवसांमध्ये शिक्षणाशिवाय महत्त्वाचे होते जीवन जगण्यासाठी काम करणे.

 हेल्मेट

या कारणामुळे ते पुढे शिकू शकले नाही.

कपूर थैली हाऊस ला प्रत्येक थैली वर 25 पैसे नफा होत होता. जे एकत्र होऊन 1961 /62 मध्ये सहा हजार रुपये झाला.

याच दिवसांमध्ये सुभाष चे भाऊ कैलास कपूर मित्र सुंरिंदर अरोडा ओईल फिल्टर बनवण्याचा बिझनेस आयडिया घेऊन आले. सुरुवातीला त्यांनी बारा ओईल फिल्टर बनवले आणि करोलबाग येथे स्थित असलेली ओरिएंटल ऑटो सेल्स ला 18 रुपयांमध्ये विकली. म्हणजे त्यांना सहा रुपयांचा नफा झाला यामुळे त्यांचा उत्साह वाढला.

त्यांनी सुरेंदर समोर पार्टनरशिपचा प्रस्ताव ठेवला परंतु सुंदरने तो नाकारला. या बदल्यात सुरिंदरने आपल्या मशीन्सना 3500 ते 4000 रुपयांमध्ये विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला सुभाषने मान्य केले आणि तीन हजार रुपयांमध्ये मशीन विकत घेतले.

सुभाष सांगतात ती माझी पहिलीच गुंतवणूक होती. लवकरच मला  कळून चुकले की मला थैली किंवा ऑईल फिल्टर या दोघांपैकी एकच निवडावे लागेल. कारण की मी कोणत्याही एका वर ध्यान केंद्रित करू शकेल.
हिम्मत जोडली आणि ओईल फिल्टर ची ऑर्डर मिळेल या आशेवर कश्मीरी गेट स्थित हंसराज ऑटो एजन्सी येथे पोहचलो. परंतु काम सोपे नव्हते. दुकानाचा मालक हंसराजने चुकीची वागणूक दिली. त्यांना ओईल फिल्टर विषयी खूप सारे प्रश्न विचारले, असे की कसे ओईल फिल्टर बनवणार , ते कोणत्या कारणांसाठी वापरता येणार.

शेवटी 13 मार्च 1963 ला दिल्लीच्या नवाबगंज मध्ये जामिरवली गल्लीमध्ये आपल्या परीवारा सोबत पार्टनरशिप मध्ये स्टिलबर्ड इंडस्ट्रीजची स्थापना केली. स्टील बर्ड हे नाव सुरेंदर ने सुचवली होती.

सुभाष अभिमानाने सांगतात की  तेथून पुढे मी कधीही मागे वळून पाहिले नाही. पुढच्या दोन वर्षात त्यांनी ट्रॅक्टर साठी जवळपास 280 प्रकारचे ऑईल फिल्टर बनवले. त्यामध्ये फ्युल, एअर, हायड्रोलिक आणि लिफ्ट सहभागी होते.
काही वर्षांमध्ये ते एवढे यशस्वी झाले की त्यांचे मित्र व्यवसायासाठी त्यांचे सल्ला घेण्यास येऊ लागले. त्यांनी मित्रांना हेल्मेट बनवण्याचा सल्ला दिला कारण सरकार हेल्मेट कंपल्सरी करत होते.

हेल्मेट
एक दिवस त्यांच्या डोक्यात विचार आला मित्रांना सल्ला देण्यापेक्षा आपण स्वतः हेल्मेट निर्माणाचे कार्य सुरु करु.

सत्तरच्या दशकाच्या अगोदर भारतामध्ये हेल्मेट घालणं हे अनिवार्य नव्हते  आणि हेल्मेट वापरत होते ते विदेशातून आयात केली जात असत. 1976 मध्ये दिल्ली सरकारने हेलमेट घालने अनिवार्य केले.

पिल्किंगटन लिमिटेड पहली कंपनी होती जिने भारत मध्ये फ़ाइबरग्लासचा प्लांट लावला. सुभाष या कंपनीमध्ये काही लोकांना ओळखत होते, आणि सुहासला हेल्मेट निर्माण करण्याबाबत सगळी माहिती दिली. हेल्मेट घालने अनिवार्य असण्याच्या दिवसाच्या जवळजवळ हेल्मेट निर्माण चे कार्य सुरू झाले.

त्यांनी दिल्लीतील काही दुकानांमध्ये आपल्या हेल्मेटची मार्केटिंग सुरू केली. सुरुवातीला याची किंमत 65 रुपये होती परंतु काही दुकानदार यांची किंमत साठ रुपयाला घेऊ पाहत होते. परंतु त्यांनी  किंमत कमी केली नाही कारण त्यांना माहित होते दुकानदारांना त्यांच्याशिवाय  हेल्मेट खरेदी करणे शक्य नव्हते. जेव्हा मागणी वाढली तेव्हा दुकानदारांनी हेल्मेट खरेदी करण्यास सुरुवात केली. यातून  त्यांनी एकाच दिवशी बाजारातून अडीच लाख रुपये कमाई केली.

त्यांनी पूर्ण रक्कम प्रचार प्रसार करण्यासाठी घालवली. याचा त्यांना फायदा झाला दिलबर हेल्मेट ची मागणी कित्येक पटींनी वाढली. त्यांनी हेल्मेट चा भाव 65 रुपये वरून 70 रुपयांपर्यंत वाढवला.हळूहळू कारभार वाढल्यामुळे 1980 मध्ये मायापुरी मध्ये एक एकर जमीन घेऊन त्यावर फॅक्टरी ची सुरुवात केली. परंतु त्यांना यश मिळवण्यासाठी खूप सारा अडचणींना सामोरे जावे लागले.

आज सुभाष सांगतात त्यांना एका गोष्टीची खंत आहे की त्यांचे लहानपण दोन वेळचे जेवण मिळवण्यात गेले. ते हसत हसत सांगतात मौज मजा काय असते ते मला माहीत नव्हते, परंतु आता नातवंडासोबत मी ते दिवस जगण्याचा प्रयत्न करत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here