आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे बंगळुरूचा संघ 69 धावांनी पराभूत: सर रवींद्र जडेजा ठरला हीरो


 

आयपीएल 2021 चा 19 वा सामना आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे 80 धावांनी सामना जिंकला. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 4 विकेट गमावत 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 122 धावा करू शकला.

रवींद्र जडेजा

चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहता ऋतुराज गायकवाडने संघाकडून शानदार 33 धावा केल्या तर फाफ डुप्लेसिसने शानदार 50 धावा केल्या, रवींद्र जडेजाने संघासाठी जबरदस्त कामगिरी दाखवत 28 चेंडूंत 62 धावा केल्या.

आरसीबी गोलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिले तर युजवेंद्र चहलने या सामन्यात चहलने 3 षटके टाकली ज्यामध्ये त्याने एक बळी घेत 24 धावा दिल्या, तर हर्षल पटेलने 4 षटकांत 51 धावा देऊन तीन बळी घेतले.

आरसीबीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे पाहता देवदत्त पडिक्कलने संघाकडून उत्कृष्ट सुरुवात केली. तो 15 चेंडूत 34 धावांवर बाद झाला. याशिवाय कोणताही फलंदाज खास कामगिरी करु शकला नाही. 22 धावांचा खेळी करत ग्लेन मॅक्सवेल बाद झाला, परंतु संघास सामना जिंकून देण्यास या धावा पुरेश्या नव्हत्या.

https://yuvakatta.com/

चेन्नईकडून गोलंदाजांच्या कामगिरीकडे पाहिले तर रवींद्र जडेजाने 4 षटकांत 13 धावा देत तीन विकेट घेतल्या. क्षेत्ररक्षणामध्येही रवींद्र जडेजाने आरसीबीच्या एका फलंदाजास धावबाद केले. सामन्यात इम्रान ताहिरला 2 विकेट मिळाले.

या सामन्यात विराट कोहलीची सर्वात मोठी चूक ही होती की त्याने वॉशिंग्टन सुंदरला वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले, हा कुठेतरी आरसीबीचा चुकीचा निर्णय होता. तेथे कोहलीने मॅक्सवेलला पाठवायला हवे होते. सुंदरच्या येण्यामुळे आरसीबीची टीम दबावात आली.

त्याच सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजीकडे पाहता टीमकडून एकूण 7 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. यात वॉशिंग्टन सुंदरकडून चांगली गोलंदाजी झाली, पण कोहलीने त्याला केवळ 2 षटके गोलंदाजी करण्यास दिले, तर युजवेंद्र चहलने केवळ 3 षटके टाकली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here