आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का: स्टार खेळाडू आर अश्विनने घेतली आयपीएलमधून माघार;जाणून घ्या कारण


संपूर्ण देश यावेळी कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेविरुद्ध झुंज देत आहे. कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातील  रुग्णालये रूग्णांनी भरली आहेत. प्रत्येकजण औषधे, बेड आणि ऑक्सिजन गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुतांश राज्यात लॉकडाउन लावण्यात आले आहे. दरम्यान, मोठी बातमी येत आहे की, कोरोनामुळे दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज आर. अश्विन आयपीएलच्या 14 व्या मोसमातून माघार घेत आहे.

आर अश्विन

अश्विनने सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्याने ट्विट करुन म्हटले आहे की, ” मी उद्या (मंगळवार) पासून यंदाच्या आयपीएलमधून ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोविड 19 विरूद्ध लढाई लढत आहे आणि मला या कठीण काळात त्यांच्या सोबत रहायचे आहे. जर गोष्टी योग्य दिशेने गेल्या तर मी परत येईन.”

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हर जिंकल्यानंतर अश्विनने हे ट्विट केले. यंदाच्या मोसमात आर अश्विनला 5 सामन्यांत एकच यश मिळवता आले. दिल्ली कॅपिटल्सला आता आपला पुढील सामना 27 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळायचा आहे आणि अश्विनविना संघ मैदानात उतरेल. हैदराबादवर विजय मिळविल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.

आर अश्विन

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 4 बाद 159 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादलाही निर्धारित षटकात 7 बाद 159 अश्या समान धावा करता आल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. मात्र, या सामन्यात अश्विनला कोणतेही यश मिळू शकले नाही. अश्विनने 4 षटकांत 27 धावा दिल्या. इतकेच नाही तर दिल्लीसाठी खेळताना गेल्या 5 सामन्यांत त्याला फक्त एक विकेट घेता आली. गेल्या 4 सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही.

आर अश्विन सध्या कसोटी क्रिकेटच खेळत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो एकदिवसीय आणि टी ट्वेंटीमधील एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. खराब कामगिरी आणि वाढत्या स्पर्धेमुळे तो संघाबाहेर फेकला गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र तो दमदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here