आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

पुरुषप्रधान समाजामध्ये एक युवा महिला उद्योजक प्रोफेशनल पद्धतीने करत आहे अंत्यविधी.


मृत्यू एक निष्ठूर कारभार आहे, परंतु कोलकत्ताची एक सॉफ्टवेअर इंजिनियर श्रुती रेड्डी सेठीने याला आपला व्यवसाय बनवले आहे .श्रुतीच्या या व्यवसायाने एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराचे काम सोपे केले.आपल्या या अनोख्या सेवेद्वारे त्यांची ‘कंपनी’ अंत्येष्टी ने एका वर्षात सोळा लाख रुपये कमावले आहेत .


जेव्हा कोणाचा  मृत्यू होतो तेव्हा श्रुतिचे काम सुरू होते.

ती सांगते जेव्हा आम्हाला कोणाचा फोन येतो, तेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करतो. आम्हीही बघतो की मृत शरीराला ठेवण्यासाठी फ्रिझर बॉक्सची गरज आहे का? जेव्हा न येणारे वाहन स्मशान घाटात पोहोचते तेव्हा जर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांना मृत्यु प्रमाणपत्र पाहिजे असेल तर ते कोलकाता मुन्सिपल ऑफिसमधून मिळवून देतो. यानंतर आम्ही परिवाराला पॅकजच्या आधारावर पंडिताची सोय करून देतो.

 

त्यांची कंपनी अंतेष्टी जवळ खूप सार्‍या व्यवस्था आणि सोयी आहेत. असे की व्हिआयपी शववाहन सुविधा, मोबाईल फ्रिजर किंवा शवलेपण, अस्तिया संग्रह आणि श्राद्ध करणे. कंपनी ह्या सुविधा वेगवेगळ्या समाजांना जसे की आर्य समाज, मारवाडी समाज, बंगाली समाज आणि गुजराती समाजाला अडीच हजारांपासून एक लाख रुपयांमध्ये पुरवते.

ती सांगते की, मी एक अशी कंपनी जी अंतिम संस्कार करण्यासाठी मदत करेल याची आयडिया सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पतीसोबत शेअर केली. त्यांच्या पतीने तिची साथ देण्याची तयारी दाखवली. परंतु यामुळे त्यांच्या आई-वडील खूप नाराज होते. त्यांचे म्हणणे होते असे काम करणे म्हणजे एका आयटी इंजिनियर साठी अपमानास्पद बाब आहे.

त्यांनी तिच्यासोबत एक महिनाभर बोलणे बंद केले.

2015 मध्ये  तिचे पती नोकरीसाठी कोलकत्ता येथे  आले तेव्हा तीही त्यांच्यासोबत कोलकाताला आली.
मुळात ती हैदराबादची आहे तिथे तिने शिक्षण पूर्ण केले. तिला एक लहान भाऊ सुद्धा आहे. तिचे वडील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. तसेच तिची आई घरून साड्या विकण्याचे काम करत होती.

श्रुती ने पब्लिक स्कूलमध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी 2002 मध्ये लिटिल फ्लावर ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. साल 2006 संपता संपता त्यांनी होच रेड्डी इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिग्री मिळवली आणि आपले गृहनगर हैदराबाद सोडले.

ती सांगते तिने एक ज्युनियर प्रोग्राम या पदावर एक आयटी कंपनी जॉईन केली. 2011 मध्ये अजून एक आयटी कंपनीमध्ये नोकरी केली आणि हैदराबादहुन वापस आली. 2009 साली त्यांनी गुरुविंदरसिंह सेठी यांच्यासोबत लग्न केले . गुरविंदर हैदराबाद मध्ये टाटा मोटर्स मध्ये काम करत होते.

ती सांगते जिंदगी कोणत्याही अडचणी शिवाय चालू होती परंतु 2011 मध्ये त्यांच्या पतीचे कोलकाता येथे ट्रान्सफर झाली. काही दिवस त्यांना घरून काम करण्याची अनुमती मिळाली परंतु 2015 मध्ये त्यांच्या कंपनीने हैदराबाद येथे येऊन काम करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

ती म्हणते मी एमबीए करणार होते ज्यामुळे मला व्यवसायामध्ये मदत होईल. मी जीमैटची परीक्षा पास केली ज्यामुळे मला एम बी ए स्कूलला प्रवेश मिळेल. तिला आय आई एम लखनऊ आणि इंदोर येथे प्रवेश घेण्यासाठी प्रस्ताव मिळाला ती प्रवेश घेणार होती इतक्यात तिचा मित्र सिद्धार्थ चुडीवालने तिला डिग्री ऐवजी व्यवसायांमध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला. त्यांनी श्रुतीला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले त्यामुळे सगळे काही शक्य होते.

अंत्यविधी
त्यांचा सल्ला कामास आला परंतु श्रुतीला बिझनेस किंवा व्यवसाय करण्याची एबीसीडी सुद्धा माहीत नव्हती.
ती सांगते अंतिम संस्काराशि जोडलेला व्यवसाय करण्याच्या तिने विचार केला होता. ती सांगते माझ्या पतीच्या नानाच्या  मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले होते.
याप्रकारे तिने अंतिम संस्काराशि जोडलेल्या व्यवसायांमध्ये पदार्पण केले. यामध्ये अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवणे तसेच मृत शरीराला सुरक्षित ठेवण्याचे प्रक्रिया सुद्धा होती.

श्रुतीने 19 फेब्रुवारी 2016 ला अंत्येष्टी फ्युनरल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ची सुरुवात केली.

ती स्वतः कंपनीचे फाउंडर डायरेक्टर आहे आणि तिच्याकडे 99 टक्के शेअर्स आहेत.

श्रुती ची योजना 2025 पर्यं या कंपनीचा विस्तार करणे अशी आहे. ति कंपनीची फ्रॅंचाईजी देण्याच्या विचारात आहे. ती सांगते की तिच्या अनुभवांनी त्यांना पैशाची किंमत कळाली आहे आणि मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे.
चार वर्षाच्या मुलाची आई श्रुतीला समजूतदारपणे सांगते, पृथ्वीवरील आपल्या अस्तित्वाला सार्थक बनव, कारण की तुम्ही दुसऱ्याच्या कामाला येऊ शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांना कमी समजू नका. जर तुम्ही मोठा विचार कराल तर लहान समस्या आपोआप सुटले जातील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here