आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

माथाडी कामगाराने रचली कोरोनावर कविता.

सोशल मीडियावर कविता होताहेत प्रचंड व्हायरल
सामाजिक परिस्थिती काव्यातून व्यक्त.


‘मी तुमच्यासाठी उभा आहे, मी दिवस बघत नाही, मी रात्र बघत नाही, मी तुमच्यासाठी झटत आहे, कारण मित्रांनो मी तुमच्यासाठी उभा आहे.’ सध्याच्या परिस्थितीत अत्यंत समर्पक अशी ही कविता कुण्या मोठ्या कवीने नाही तर सोलापूर शहरातील एका माथाडी कामगाराने लिहली आहे. विकास वाघमारे असे या युवा कवीचे नाव आहे.

कोरोना या महाभयानक विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डॉक्टर, नर्स, रुग्णसेवक अाणि पोलीस आपापल्या परीने योगदान देत आहेत. या महामारीच्या काळात त्यांनी दिलेले योगदान आपल्या शब्दरूपी काव्यातून व्यक्त केले आहे. लॉकडाऊन दरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत त्याने एकूण पन्नासपेक्षा जास्त कविता लिहिल्या आहेत.

 

लष्कर कुंभार गल्ली येथे राहणारा विकास वाघमारे हा ३३ वर्षीय युवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माथाडी कामगार म्हणून गेल्या १५ वर्षांपासून काम करत आहे. अवघे दहावीचे शिक्षण घेतलेल्या विकासला लहानपणापासून कवितेची आवड निर्माण झाली. शाळेत शिकवल्या जाणाऱ्या कविता ऐकून आणि म्हणून त्याला कविता करण्याचे वेड निर्माण झाले. आपल्या वाटेला आलेली गरिबी, माथाडी कामगारांची परिस्थिती, स्त्रियांवरील अत्याचार काव्यातून मांडू लागला.

कविता

पुढे कविता लिहणे हा त्याचा छंद बनला. कामातून मिळालेला फावला वेळ तो कविता करणे आणि पुस्तक वाचण्यावर भर देतो. परिस्थितीअभावी त्याला पुढचे शिक्षण घेता आले नाही. एक कवी म्हणून नावारूपास येण्याची तशी धडपड सुरू आहे.
सद्य परिस्थितीवर आधारित अतिशय मार्मिकपणे प्रबोधन करणाऱ्या कविता त्याने रचले आहेत. त्याचा हा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा त्याचा मानस आहे. पण आर्थिक परिस्थितीअभावी त्याला ते शक्य होत नाही.

कामगारांच्या परिस्थितीवर भाष्य.

‘मार्केटमधील हमाल आम्ही आभाड कष्ट करतो आम्ही, आमचे कष्ट कोणाच्या येत नाही ध्यानी, हमालाच्या गरजा विचाराता कोणी’ या ‘हमाल’ कवितेतून मार्केटमधल्या माथाडी कामगारांच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.

‘आईला मुलगा काळजाचा तुकडा असतो मुलाला काही झाल्यास आईचा जीव तुटतो आईची ही माया कसली कुणी नाही समजू शकली आई अशीच बनली’ या ‘आई’ नावाच्या कवितेतून आईचे मुलावर किती आघात प्रेम आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सांगाना बाबा सांगा, मला गर्भपात करू नको म्हणून सांगा, मला जग पाहायचे आहे, मला समाजाला समजून सांगायचा आहे.’

गर्भपातावर आधारित ‘बाबांची परी’ ही कविता हृदयाला स्पर्श करणारी आहे.

कवितेतून सामाजिक विषयांना स्पर्श.

क्रांतीसूर्य बाबासाहेब, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचा प्रहार, संत गाडगेबाबाचे महत्त्व, पैंजण,  बालपण, तो बापच असतो, बायको , सचिन तेंडुलकर, माथाडी कामगार, गर्भपात, बाबांची परी, बायको, निसर्ग, पाऊस, मार्केटमधला हमाल, शेतकर्‍याशिवाय पर्याय नाही, बाबांची परी अशा अनेक विषयांवर त्याने कविता रचल्या आहेत. कवितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक विषयांना स्पर्श केला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here