आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

पराभवानंतर सेहवागने ओढले हैदराबाद संघावर ताशेरे; म्हणाला हा फलंदाज टॉयलेटमध्ये गेला होता. . .


आयपीएलच्या 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला सुपर अोव्हरमध्ये पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित षटकात 4 गडी गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादने सात विकेट्सवर समान धावा करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

जिथे दिल्लीचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला. सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांनी सात धावा केल्या. यानंतर दिल्लीकडून रिषभ पंत आणि शिखर धवन यांनी आठ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

पृथ्वी शॉने दिल्लीत सर्वाधिक 53 धावा केल्या. विल्यमसनने हैदराबादकडून 66 धावा केल्या. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने तुफानी फलंदाजी केली. त्याने 18 चेंडूत 38 धावा केल्या. भारतीय माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सुपर षटकात झालेल्या पराभवानंतर हैदराबादच्या संघाची चांगलीच खरडपट्टी काढली.

सेहवाग

बेअरस्टोला सुपर ओव्हरमध्ये खेळायला पाठवले नाही म्हणून सेहवागने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सेहवागने ट्विट केले की “तो बहुधा शौचालयात होता. बेअरस्टो सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पहिला पर्याय का नव्हता? हे मला समजत नाही. त्याने 18 चेंडूंत 38 धावांचे तुफानी डाव खेळला होता आणि तो सर्वात नेत्रदीपक फलंदाजी करत होता. हैदराबादने चांगली टक्कर दिली असली तरी या पराभवासाठी त्यांनी स्वत: साठी घेतलेल्या निर्णयाला दोषी ठरवायला हवे.”

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हैदराबादला अंतिम षटकात 16 धावा कराव्या लागल्या. पण 16 धावा झाल्या आणि सामना सुपर अोव्हरमध्ये गेला. मोसमातील हा पहिला सुपर ओव्हर सामना होता. या विजयासह दिल्ली संघ पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. संघाचा हा चौथा विजय आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here