आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कोलकाता नाइट रायडर्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर एकतर्फी विजय: कर्णधार मॉर्गन विजयाचा नायक


 

दोन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर राहुल त्रिपाठी(41) आणि कर्णधार इयान मॉर्गन (47*) यांच्या जबरदस्त खेळीने पंजाब किंग्सवर विरुध्द झालेल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने पंजाबला 9 बाद 123 धावांवर रोखले आणि त्यानंतर केकेअारने 16.4 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा करुन सहज विजय मिळविला. कोलकाताचा हा सहा सामन्यातला दुसरा विजय आहे तर सहा सामन्यात पंजाबचा हा चौथा पराभव आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने पहिल्या तीन षटकांत तीन गडी गमावले. नितीश राणा याला खाते उघडण्याची कोणतीही संधी न देता मोईसेस हेनरिक्स पहिल्याच षटकात शाहरुख खानकडून झेलबाद केले. पुढच्या षटकात मोहम्मद शमीने शुभमन गिलला एलबीडब्ल्यू केले. गिलने आठ चेंडूत दोन चौकारांसह नऊ धावा केल्या. डावाच्या तिसर्‍या षटकातील शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने सुनील नरेनला बाद केले.

कोलकाताच्या तीन विकेट फक्त 17 धावांवर पडले, परंतु राहुल त्रिपाठी आणि मॉर्गन यांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  संघाच्या 83 धावा असताना राहुल त्रिपाठीने शाहरुख खान हाती झेल देऊन बाद झाला. त्याला दीपक हुड्डाने बाद केले. राहुलने 32 चेंडूत 41धावा करत. या खेळीत शानदार 7 चौकार ठोकले.

यानंतर मैदानावर उतरलेल्या आंद्रे रसेलने मॉर्गनबरोबर डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता, पण संघाची धावसंख्या 98 असताना अर्शदीपचा थेट थ्रोवर तो धावबाद झाला. रसेलने दोन चौकारांच्या मदतीने नऊ चेंडूंमध्ये 10 धावा केल्या. त्यानंतर मैदानावर दिनेश कार्तिकने दोन चौकारांच्या मदतीने सहा चेंडूंत 12 धावा फटकावल्या. कार्तिकने विजयी चौकार ठोकला.  कर्णधार मॉर्गनने 40 चेंडूत नाबाद 47 धावांमध्ये चार चौकार आणि दोन षटकार लगावले.

 

तत्पूर्वी, कोलकाताच्या प्रसिद्ध कृष्णाने 30 धावा देऊन तीन गडी बाद केले, पॅट कमिन्सने 31 धावा देऊन दोन गडी बाद केले आणि सुनील नरेनने 22 धावा देऊन दोन बळी घेत पंजाबला 123 धावांवर रोखले. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

कोलकाता नाइट रायडर्स

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने 19 धावा केल्या आणि संघाच्या 36 धावा असताना तो बाद झाला. यानंतर ख्रिस गेल भोपळाही फोडू शकला नाही तर दीपक हुड्डा एक धावावर परतला. सलामीवीर मयंक अगरवालने 34 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. संघाची धावसंख्या 60 असताना तो बाद झाला.

सुनीस नरेनच्या चेंडूवर मोईसेस हेनरिक्स दोन धावांवर बोल्ड झाला. निकोलस पूरनने 19 चेंडूंत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 19 धावा केल्या. शाहरुख खान 14 चेंडूंत 13 धावांवर बाद झाला. डावाच्या शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनने प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या तीन चेंडूंमध्ये दोन षटकार ठोकले परंतु त्यानंतर चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. जॉर्डनने 18 चेंडूत 30 धावांमध्ये एक चौकार आणि तीन षटकार ठोकले.  अशाप्रकारे, पंजाबचा डाव 123 धावांवर थांबला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here