आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

कौतुकास्पद! हा कांगारू खेळाडू आला भारतीयांच्या मदतीला धावून: दिली 37 लाखाची मदतआयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे सुमारे 37 लाखांची मदत जाहीर केली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीस 50 हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे.

 खेळाडू

त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन लिहिले की, ”भारत हा असा देश आहे जिथे मला कित्येक वर्षांपासून खूप प्रेम मिळाले आहे आणि इथले लोक प्रेमळ आहेत आणि पाठिंबा देखील देत असतात. मला माहित आहे की, देशातील कोरोना विषाणूमुळे देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता यासह अनेक समस्या आल्या आहेत. एक खेळाडू या नात्याने मी पीएम केअर फंडात सहाय्य स्वरूपात 50 हजार अमेरिकन डॉलर्स (सुमारे 37 लाख रुपये) देऊ इच्छितो.”

त्यांनी पुढे असेही लिहिले आहे की, “मी माझ्या सहकारी खेळाडूंनाही मदतीसाठी पुढे यावे अशी विनंती करतो. यावेळी प्रत्येकजण असहाय्य वाटत आहे. कदाचित मला उशीर झाला असेल परंतु याद्वारे आम्ही लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करू. शेवटी त्यांनी लिहिले की जरी माझी मदत मोठी नसली तरी ते एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.”

खेळाडू

कोरोनामुळे भारतातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बर्‍याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल 2021 मधून नावे मागे घेतली आहेत. अँड्र्यू टाय, अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांचा समावेश असून या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सध्याच्या मोसमातून आपली नावे मागे घेतली आहेत. झॅम्पा आणि रिचर्डसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात.

ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन आणि डॅनियल सॅम्स यांच्या रूपात आणखी तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आरसीबी संघात कायम राहतील. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यासारखे मोठे दिग्गज खेळाडूसह एकूण 14 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आयपीएल 2021 मध्ये खेळत राहतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here