आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

आपले राज्य बिहारला गुजरात सारखं समृद्ध बनवण्याचं वेड!


 

जेव्हा दहा वर्षांपूर्वी कौशलेंद्रा यांनी सुरुवात केली होती, तेव्हा त्यांच्या पाशी फक्त एक छोटी रूम आणि त्यांचे स्वप्न होते. आज यांचा उपक्रम कौशल्या फौंडेशन बिहारमध्ये वीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बाजारांमध्ये कमाई करण्याचे कौशल्य शिकवतो.

त्यांच्या कंपनीने ताज्या पालेभाज्या विकून पाच करोड रुपयांचा व्यवसाय केला.

आईआईएम अहमदाबादच्या एका बैचचे टॉपर कौशलेंद्रने दोन कंपन्या स्थापित केल्या. कौशल्या फ़ाउंडेशन, ज्याच्या उद्दिष्ट पैसा कमावणे नव्हते आणि 2008 मध्ये निड्स ग्रीन प्राइवेट लिमिटेड (केजीपीएल).

कौशलेंद्र खूपच गोष्टींमध्ये वेगळे आहेत. ज्या प्रकारे समाजामध्ये जाती धर्मावरून भेदभाव होतो त्याच्या ते विरोधात आहे. प्रतिष्ठित भारतीय प्रबंध संस्थान (आईआईएम) अहमदाबाद येथुन टॉप केल्यानंतर ते मल्टीनेशनल कंपनीत काम करू शकत होते किंवा विदेशात सुद्धा जाऊ शकत होते. त्यांच्या खूप सहकार्‍यांनी असेच केले.

परंतु ते काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात होते. आपले राज्य बिहारमधील लोकांचे जीवनमान बदलावे असा त्यांचा विचार होता.

कौशलेंद्रा म्हणतात ते तेव्हाच शक्य होते जेव्हा मी जमीन लेव्हलला काही काम करण्यास सुरुवात करल.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील मोहम्मदपुर गावामध्ये 14 जानेवारी 1981 ला त्यांचा जन्म झाला. तीन लेकरांमध्ये कौशलेंद्र सगळ्यात लहान होते. त्यांच्या आई वडील सरकारी नोकरीत होते.

गावातच त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यांचे पुढील शिक्षण जवळच जवाहर नवोदय विद्यालय मध्ये झाले.ते सांगतात तिथे गरीब मुलांना सुद्धा प्रवेश मिळतो जर त्यांनी त्याची पात्रता परीक्षा पास केली तर. ते सांगतात या विद्यालयांमध्ये एवढ्या गरीब घरचे मुलं होते की त्यांना सुट्ट्यांमध्ये घरी जायला सुद्धा जमत नव्हते कारण सुट्ट्यांमध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांच्या घरी होऊ शकत नव्हती.

ते सांगतात मी हे सर्वकाही पाहिलेले आहे समाजामध्ये गरिबी दूर करण्यासाठी पर्याप्त मार्ग उपलब्ध नाहीत .
1996 मध्ये त्यांनी शाळेचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये हि गोष्ट आली होती कि सामाजिक असमानतेशी निपटण्यासाठी काहीतरी करावे लागेल.

बिहार


पटना च्या सायन्स कॉलेजमधून हायर सेकंडरी पास केल्यानंतर कौशलेंद्रा गुजरात जुनागड मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च मध्ये एग्रीकल्चर इंजीनियरिंग मध्ये बी टेक करण्यासाठी गेले. ते सांगतात मला आय आयटीला प्रवेश घ्यायचा होता परंतु प्रवेश पात्रता मी पास करू शकलो नाही. शेतकऱ्यांसाठी काम करणे माझ्या नशिबात असेल यामुळे मी आईसीएआर ला पोहोचलो.

ते सांगतात त्यावेळी माझ्या राज्यामध्ये पक्के रस्तेही नव्हते आणि लाईट ची सुविधा सुद्धा नव्हती . गुजरात मध्ये 24 तास लाईट आणि पक्के रस्ते होते.

दुसऱ्या पासून वेगळे माझे गुजराती मित्र प्लेसमेंटची काळजी करत नव्हते. ते सगळे व्यवसायिक बनवू इच्छित होते आणि स्वतःचा उद्योग उभारून इच्छित होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मीही स्वतःचे काही करण्याचे ठरवले. माझे स्वप्न होते की माझे राज्यसुध्दा गुजरात सारखे समृद्ध व्हावे.

वर्ष 2003 मध्ये त्यांचा कोर्सच्या  चांगल्या प्रदर्शनाने पूर्ण झाल्यामुळे त्यांना गोल्ड मेडल मिळाले. यानंतर त्यांनी नेटाफिम नावाच्या एका इस्राईलच्या कंपनी मध्ये सहा महिने ट्रेनी फिल्ड ऑफिसर म्हणून काम केले. ती कंपनीच्या साठी ड्रिप इरिगेशन चे काम करत होती. या कामासाठी कौशलेंद्रा ला दर महिन्याला सहा हजार रुपये मिळत होते. त्यांना आंध्रप्रदेशला पाठवण्यात आले जिथे त्यांचे काम शेतकऱ्यांना भेटणे आणि कंपनीच्या सुविधा त्यांना सांगणे होते.

ते सांगतात माझे काम शेतकऱ्यांना भेटणे आणि त्यांच्या समस्या समजावून घेणे होते. ते सांगतात शेतकऱ्यांना शेती पासून जास्त उत्पादन काढण्यासाठी शिक्षित करणे गरजेचे होते. त्यांनी काही नवीन सुरू करण्याचा विचार सुरू केला. वर्ष 2004 च्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी आपला राजीनामा दिला.

नोकरी सोडल्यानंतर ते आपले मित्र पंकज कुमार ला भेटण्यासाठी अहमदाबादला गेली जो एम बीए च्या परीक्षेची तयारी करत होता.कौशलेंद्रा सांगतात पुढे जीवनात काय करायचे यासाठी मी सुद्धा खूप परेशान होतो काहीच नव्हते त्यामुळे मीही एमबीएची कोचिंग घ्यायला सुरुवात केली.

कौशलेंद्रनी कैट आज केली आणि शेवटी त्यांना 2005 मध्ये आईआईएम अहमदाबाद येथे प्रवेश मिळाला.
त्यांनी या राष्ट्रीयीकृत बँकेमधून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि वर्ष 2007 ला आपल्या बॅचचे टॉपर राहिले. यासाठी त्यांना पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.

पटना येथे परत आल्यानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण साठी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात केली. पुरस्कार म्हणून मिळालेल्या पैशांमधून 1200 रुपये महिना किरायाने एक खोली घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची बोलणी केली.

कौशल केंद्र सांगतात ज्या गोष्टी व मला स्पष्ट विश्वास होता माझ्या राज्याची परिस्थिती तेव्हाच भरलेल्या माहिती शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल आणि त्यासाठी जमिनी स्तरावर काम करण्याची गरज होती. यासाठी त्यांनी नऊ महिने राज्याचा दौरा केला.

यासाठी ते गावागावात गेले शेतकऱ्यांशी बोलली केली शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या अडचणी शेती साठी येणारा खर्च त्यातून मिळणारा नफा या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या.

कौशलेंद्रा यांना या गोष्टीची जाणीव झाली या क्षेत्राला पहिल्यांदा संघटीत होणे खूप गरजेचे आहे.जानेवारी 2008 पर्यंत त्यांनी दोन कंपन्यांचे गठन केले – कौशल्या फ़ाउंडेशन, आणि निड्स ग्रीन प्राइवेट लिमिटेड (केजीपीएल) , ज्या एक व्यावसायिक कंपन्या होत्या.

त्यांनी मोठा भाऊ धीरेन्द्र कुमार सोबत त्याच किरायाच्या खोली मधून काम करण्यास सुरुवात केली. धीरेंद्र ने एक औषध बनवणारी कंपनी मधील काम सोडून कौशलेंद्रा सोबत काम सुरु केले होते. ते सांगतात मी शेतकऱ्यांना खत आणि शेती करण्याचे वेगवेगळे प्रकार यांची माहिती देईल. ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढेल.

दुसरीकडे प्रावेट लिमीटेड या कंपनीचे उद्दिष्ट होते शेतकऱ्यांपासून भाजीपाला खरेदी करणे आणि दुकानदारांना योग्य किमतीमध्ये विकणे. ते सांगतात माझे लक्ष हे होते शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळेल आणि खरेदी करणाऱ्यांना तो माल योग्य भावात मिळेल. के जी पी एल चे मुख्य काम होते सप्लाय चेन मार्केट वर लक्ष केंद्रित करणे. भाजीपाला समृद्धी ग्रीन एसी कार्टस च्या माध्यमातून विकला जाऊ लागला.

बिहार

कौशल्या फौंडेशन ची सुरुवात पन्नास हजार रुपयांपासून झाली ज्याला मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून जमवले होते.
मार्च 2008 ला कौशलेंद्रा ला एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून 50 लाख रुपये कर्ज मिळवण्यात यश आले .
त्याच वर्षी एका प्रोफ़ेसर ने त्यांचा परिचय फ्रेंड्स ऑफ़ वूमेंस वर्ल्ड बैंकिंग (एफ़एफ़डब्ल्यूबी) ला करून दिला ज्यांनी कौशलेंद्र ला पाच लाख रुपये कर्ज दिले.

खरे काम तर पुढे होते शेतकऱ्यांना त्यांच्या आयडिया बद्दल समजावून सांगणे एवढे सोपे नव्हते जे त्यांना सुरुवातीला वाटले होते. ते सांगतात कोणीही त्यांच्या ट्रेनिंग च्या आयडियाला गंभीरता पूर्वक घेतले नाही. त्यांना वाटत नोकरी नाही करून मी माझे शिक्षण बरबाद केले आहे आणि आता त्यांच्या कारभाराला बरबाद करत आहे. त्यांना समजावून सांगणे खूप अवघड होते.

शेवटी कौशलेंद्रा ने फक्त तीन शेतकऱ्यांना घेऊन ट्रेनिंग ला सुरुवात केली. कौशलेंद्रा सांगतात आम्ही कर्जाच्या पैशांनी तीन वातानुकूलित वाहन खरेदी केले. आम्ही दुकानदारांना विश्वास दिला की त्यांनी आमचा माल खरेदी करावा आणि तो इतर दुकानदारांना पेक्षा स्वस्त विकावा. माझा भाऊ आणि मी सुद्धा पटना चा रस्त्यावर भाजीपाला विकला.

पहिले वर्ष 2008 2009 सहा लाख रुपये होता. 2018 मध्ये कंपनीच्या एकूण 65 गाड्या पटना मध्ये भाजीपाला विकत होत्या. याचा कारण और 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचला परंतु थोडाफार घाटा चालूच होता.
कौशलेंद्रा सांगतात, व्यवसायामध्ये वाढ होऊन सुद्धा आमचा घाटा चालू होता, कारण आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव देत होतो आणि आपला माल कमी भावामध्ये विकत होतो.

शेवटी वर्ष 2014 मध्ये त्यांनी आपली रणनीती बदलली आणि विक्रेत्यांना भावांमध्ये बदलाव करण्याची अनुमती दिली. अजून त्यांनी आपल्या कंपनीला ही संघटित केले यामुळे खर्च कमी होईल.आज एकिकडे कौसल्या फाउंडेशन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देते तर दुसरीकडे के जी पी एल ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते.

वर्ष 2016 17 मध्ये केजिपीएलने एकूण पाच करोड रुपयांचा व्यवसाय केला. पटना मधील खूप मोठा ऑफिसमध्ये बसून कौशलेंद्रा म्हणतात आजही शेतकऱ्यांचे प्रशिक्षण चालूच आहे.त्यांना जर वाटले केजीपीएल व्यतिरिक्त त्यांना कोणी चांगला भाव देऊ शकतो तर त्यांना सुद्धा ते स्वतःचा माल विकु शकतात.

तरुणांना त्यांचा सल्ला असेल कौशलेंद्रा सांगता आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा , कधी हार मानू नका, दुनिया उगवत्या सूर्याला नमस्कार करते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here