आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

विराटच्या ‘या’ शिलेदाराने जिंकलाय तब्बल 25 वेळा सामनावीरचा पुरस्कार: केला खास विक्रम


 

आयपीएलच्या 22 व्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर एक धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे.  या रोमांचकारी विजयाचा नायक स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स होता, ज्याच्या तुफानी फलंदाजीमुळे दिल्लीसमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात आरसीबी यशस्वी झाली.  प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित षटकात 5 गडी गमावून 171 धावा केल्या.

सामनावीर

प्रत्युत्तरादाखल दिल्ली निर्धारित षटकात 4 गडी गमावून 170 धावा करू शकली. डिव्हिलियर्सने 42 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. या तुफानी डावासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.  आयपीएलच्या इतिहासातील डीव्हिलियर्सचा हा 25 वा सामनावीर पुरस्कार आहे.

यासह त्याने आणखी एक मोठा विक्रम केला.  2011 पासून आरसीबी संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा दुसरा परदेशी फलंदाज ठरला आहे. या लीगमध्ये त्याने 5 हजार 53 धावा केल्या आहेत. डीव्हिलियर्सने आयपीएलमध्ये पदार्पण दिल्ली कॅपिटल्स कडून केले आणि या फ्रँचायझीकडून पहिले 3 मोसम खेळला. त्याने दिल्लीकडून 28 सामन्यांत 671 धावा केल्या. तर त्याने आरसीबीसाठी 4 हजार 382 धावा केल्या.

डिव्हिलियर्स व्यतिरिक्त डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करणारा पहिला परदेशी फलंदाज आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने 5 हजार 390 धावा केल्या आहेत.

सामनावीरसामनावीरसामनावीर

वॉर्नरही दिल्ली संघाचा एक भाग होता. त्याने दिल्लीकडून 55 सामन्यांत 1435 धावा केल्या. 2014 पासून तो हैदराबाद सोबत आहे. मात्र, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या लीगमध्ये 6 हजाराहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही यंदाच्या मोसमात तुफान फॉर्मात आहेत. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांच्याही बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्यामुळे आरसीबीला आयपीएल विजेता म्हणून प्रबळ दावेदार समजला जात आहे.

स्टार खेळाडूंनी भरलेल्या आरसीबीच्या संघाला अद्याप एकही आयपीएलचा किताब पटकावता आला नाही. यंदा आरसीबीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असे क्रिकेट समीक्षक आणि चाहत्यांना वाटत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here