आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

रोमहर्षक सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा एक धावांनी केला पराभव: विराटची टीम टॉपवर


 

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 22 व्या सामन्यात रोमांच शिगेला पोहोचला होता. या श्वास रोखणार्‍या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या चेंडूवर 1 धावांनी पराभूत केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 5 गडी गमावून 171 धावा केल्या. संघासाठी एबी डिव्हिलियर्सने अवघ्या 42 चेंडूत 75 धावांची शानदार फलंदाजी केली.

दिल्लीकडून संघात पुनरागमन करणार्‍या इशांत शर्माने चांगली गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 26 धावा देऊन देवदत्त पडिक्कलला बाद करत एकमेव बळी मिळवता आला.

 बंगळुरू

प्रत्युत्तरात कर्णधार रिषभ पंत (नाबाद 58) आणि शिमरॉन हेटमीयर (नाबाद 53) यांच्या डावांमुळे दिल्ली संघ 4 विकेट्सच्या नुकसानीवर 170 धावा करू शकला.

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरवात चांगली झाली नाही. डावाच्या तिसर्‍या षटकात शिखर धवन (6) काईल जेमीसनच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथ (4) देखील काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर विकेटच्या मागे डिव्हिलियर्सकडून झेलबाद झाला. बोर्डवर अवघ्या 47 धावा असताना उत्तम लयीत दिसणारा पृथ्वी शॉ हर्षल पटेलच्या चेंडूवर 21धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार पंतने मार्कस स्टॉयनिससह चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली.

पण हर्षल पटेलने एकदा स्टायनिसला बाद केले आणि दिल्लीला बॅकफूटवर ढकलले. दिल्लीचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता आणि पराभव निश्चित झाला होता, पण त्यानंतर शिमरॉन हेटमायरने पुढाकार घेतला आणि काइल जेमिसनच्या 18 षटकात तीन षटकार ठोकत आपला हेतू स्पष्ट केला. हेटमायरने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याची फलंदाजी पाहून असे वाटते की, तो दिल्लीला विजयाच्या उंबरठ्यावर नेईल.

बंगळुरू

अखेरच्या षटकात दिल्लीला 14 धावांची आवश्यकता होती, परंतु मोहम्मद सिराजने पहिले चार चेंडू योग्य ठिकाणी फेकले आणि फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर दिल्लीला आता 2 चेंडूमध्ये 10 धावा हव्या. पंतने षटकातील पाचव्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने चौकार ठोकला आणि सामना रोमांचक केला. शेवटच्या चेंडूवर दिल्लीला विजय मिळवण्यासाठी सहा धावांची गरज होती, परंतु कर्णधार पंत केवळ चौकार ठोकू शकला आणि दिल्लीला या मोसमातील दुसरा पराभव पत्करावा लागला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आणि संघाने कर्णधार विराट कोहली (12) आणि देवदत्त पडिक्कल (17) यांच्या विकेट फक्त 30 धावांच्या आत गमावल्या. यानंतर मॅक्सवेलसह रजत पाटीदार (31) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली, पण मॅक्सवेल अमित मिश्राच्या जाळ्यात अडकला आणि स्मिथकडून 25 धावांवर झेलबाद झाला. यानंतर एबी डिव्हिलियर्सने फलंदाजी करताना फक्त 42 चेंडूत 75 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. डीव्हिलियर्सने मार्कस स्टोयनिसच्या डावाच्या शेवटच्या षटकात तीन षटकारांसह 23 धावा केल्या.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here