आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

स्वतः खेळपट्टी बनवून गोलंदाजीचा सराव करायचा भारताचा ‘हा’ स्टार लेगस्पिनर: आज करतोय आयपीएलमध्ये धमाका


 

आयपीएलच्या 14 व्या सत्राचा 21 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. ज्यामध्ये पंजाबच्या 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने 5 गडी राखून विजय मिळविला. मात्र, पंजाबच्या खेळाडूच्या क्षेत्ररक्षणाने सर्वांची मने जिंकली.

होय, आम्ही बोलत आहोत 20 वर्षीय युवा गोलंदाज रवी बिश्नोई, ज्याने सुनील नरेनचा असा झेल पकडला की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. एवढेच नव्हे तर तो पंजाबसाठी यशस्वी गोलंदाज असल्याचेही सिद्ध झाले. त्याने केकेआरला 4 षटकांत सर्वात कमी 19 धावा दिल्या. या खेळाडूचे जितके कौतुक होईल तितके कमीच. राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने अथक परिश्रमानंतर आज या टप्प्यावर पोहोचला आहे.

 खेळपट्टी

 

स्वत: काम करुन बनविला क्रिकेट खेळपट्टी

त्या खेळाडूंच्या खेळाचा आपल्यावर अधिक प्रभाव होतो, जे प्रचंड मेहनतीने क्रिकेटमध्ये आपले स्थान बनवतात. असाच काही पराक्रम पंजाबचा युवा गोलंदाज रवी बिश्नोई यांनी दाखवला आहे. 5 सप्टेंबर 2000 रोजी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात जन्मलेल्या रवीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड. परंतु कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला महागडे क्रिकेट कोचिंग मिळू शकले नाही.

पैशांच्या अभावामुळे त्याने काम करूनच खेळपट्टी तयार करण्याचा सराव करत होता. तो स्वत: अकॅडमीत सिमेंटची पोती घेऊन जायचा आणि दगड फोडत असत, जेणेकरून पैशाची बचत होई. उर्वरित पैशांनी त्याने तज्ज्ञांना बोलावून खेळपट्टी तयार करुन त्यावर गोलंदाजीचा सराव करायचा.

 

आई गृहिणी आणि वडील शिक्षक

रविचे वडील मांगीलाल बिश्नोई जोधपूर तहसीलच्या बिरमी गावात राहणारे शिक्षक आहेत. त्याचबरोबर त्याची आई शिवरी देवी गृहिणी आहेत. त्याला अनिता आणि रिंकू या दोन बहिणी आहेत. आपल्या मुलाने क्रिकेटची आवड सोडून अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.

 

क्रिकेटसाठी बोर्डाची परीक्षा बुडवली

बिश्नोई बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला नेटवर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.  त्याने ही संधी सोडली नाही. यासाठी त्याने बोर्डाची परीक्षा सोडली  आणि आपली कारकीर्द क्रिकेट बनविण्यासाठी पुढे पाऊल टाकले.

19 वर्षांखालील संघात शानदार कामगिरी

 

सन 2019 मध्ये बिश्नोईला 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने जपानविरुद्धच्या सामन्यात 8 षटकांत 5 धावा देत 4 बळी घेतले.  या सामन्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळविला. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे बिश्नोईला सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

2020 मध्ये 2 कोटीत विकला गेला

19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्यानंतर रवी विश्नोईला मागील वर्षी पंजाब किंग्सने दोन कोटी देऊन खरेदी केले होते. आयपीएलच्या 13 व्या सत्रात त्याने 16 सामन्यांत 14 गडी बाद केले. यावर्षी त्याने 2 सामन्यात 2 बळी घेतले आहेत.

खेळपट्टी

खेळाडू क्षेत्ररक्षणातही अव्वल

आपल्या लेगस्पिनसह पंजाब किंग्जमध्ये स्थान मिळविणार्‍या रवी बिश्नोईने सोमवारच्या सामन्यात आपल्या क्षेत्ररक्षणातून सर्वांना प्रभावित केले. दुसर्‍या षटकात, अर्शदीपच्या शेवटच्या चेंडूवर सुनील नारायणने षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण या तरूण खेळाडूने डीप मिडविकेटवर त्याचा झेल घेतला आणि सुनिल खाते न उघडताच पॅवेलियनला परतला.

‘कॅच ऑफ द मॅच’

सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला असेल, पण रवी बिश्नोईला त्याच्या शानदार झेलमुळे ‘कॅच ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला.  रविने सुमारे 25 मीटर धावत जात हवेत सूर मारत सुनील नारायणचा झेल पकडला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here