आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चेन्नई सुपरकिंग्जचा विजयी ‘पंच’: हैदराबादचा सात गडी राखून केला पराभव; गुणतालिकेमध्ये चेन्नई टॉपवर


 

सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांचे अर्धशतक आणि दोघांच्या शतकी भागीदारीमुळे इंडियन प्रीमियर लीगमधील 23 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने बुधवारी सनरायझर्स हैदराबादवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने प्रथम स्थानावर स्थान मिळविले.

चेन्नई सुपरकिंग्ज

चेन्नई सुपरकिंग्सचा सहा सामन्यांमधील हा पाचवा विजय असून संघ 10 गुणांसह अव्वल स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गुण समान आहेत पण नेट रन रनमुळे चेन्नई संघ अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स सहा सामन्यांमध्ये पाचव्या पराभवानंतर दोन गुणांसह अंतिम स्थानावर आहे.

हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 171 धावा केल्या.  त्याचवेळी प्रत्युत्तरात चेन्नई संघाने 3 विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. ऋतुराज गायकवाड- फाफ डुप्लेसिसने चेन्नईकडून शानदार अर्धशतक झळकावले.

हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 171 धावा केल्या. मनीष पांडेने 46 चेंडूत सर्वाधिक 61 धावा केल्या. याशिवाय कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 55 चेंडूत 57 धावा केल्या. त्याच वेळी विल्यमसनने 10 चेंडूत 26 धावा केल्या. चेन्नईकडून लुंगी एंगेडीने 2 आणि सॅम करनने 1 गडी बाद केले.

चेन्नई सुपरकिंग्ज

 

प्रत्युत्तरादाखल चेन्नईच्या संघाची सुरुवात चांगली झाली.   डुप्लेसिस आणि ऋतुराजने पहिल्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली.  ऋतुराजने 44 चेंडूत 75 धावांची खेळी केली.  तर डुप्लेसिसने 38 चेंडूत 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने 3 गडी बाद केले. त्याने मोईन अली आणि डुप्लेसिसला एका षटकात बाद करुन सामन्यात परत येण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यात यश आले नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

मुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली संधी…..!

वाढत्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी रोज पिऊ शकता अॅपल स्मूदी; अशी आहे रेसिपी 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here