आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केला ‘हा’ नवा विक्रम; या खास यादीत झाला सामील


 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2021मधील 23 वा सामना खेळला झाला. या सामन्यात चेन्नईने सनरायझर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नईचा हा सहा सामन्यातला पाचवा विजय ठरला.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम नोंदविला आहे. वॉर्नरने टी -20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला 10 हजार धावांचा टप्पा गाण्यासाठी 40 धावांची गरज होती.

डेव्हिड वॉर्नर

डाव्या हाताने फलंदाजी करणारा हा ऑस्ट्रेलियन खेळाडू असा पराक्रम करणारा जगातील चौथा खेळाडू आहे. त्यांच्याशिवाय ख्रिस गेल, कायरन पोलार्ड आणि शोएब मलिक यांनी हे कामगिरी केली आहे. ख्रिस गेलच्या नावावर सर्वाधिक 13 हजार 839 नावे आहेत. त्यानंतर कायरन पोलार्डने 10 हजार 694 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शोएब मलिकने 10 हजार 488 धावा केल्या आहेत.

टी -20 क्रिकेटमध्ये आता डेव्हिड वॉर्नरचे 10 हजार 17 धावा आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये वॉर्नरचे नाव 50 अर्धशतक झाले आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणताही खेळाडू हा विक्रम करु शकला नाही. त्याने 148 सामन्यात हा विक्रम केला आहे.

डेव्हिड वॉर्नरडेव्हिड वॉर्नर

वॉर्नरने आयपीएलमध्ये 5447 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 200 षटकारही केले आहेत. असे करणारा तो चौथा परदेशी खेळाडू आहे. त्यांच्याशिवाय ख्रिस गेल (354 षटकार), एबी डिव्हिलियर्स आणि कायरन पोलार्ड या यादीत आहेत.

आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा डेव्हिड वॉर्नर आहे. आयपीएलमध्ये वॉर्नर एक फलंदाज म्हणून यशस्वी झाला असला तरी त्याच्या नेतृत्वाद्वारे संघाला यश मिळवून देण्यात तो कमी पडत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

मुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली संधी…..!

वाढत्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी रोज पिऊ शकता अॅपल स्मूदी; अशी आहे रेसिपी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here