आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार ‘हे’ अष्टपैलू खेळाडू…


 

वेस्ट इंडीजचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल आणि बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शकीब अल हसन पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) 2021 च्या उर्वरित भागात खेळणार आहेत. मंगळवारी याची पुष्टी करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले की, पीएसएल 2021 च्या उर्वरित भागासाठी बदली खेळाडू म्हणून रसेल आणि शाकिब यांच्या बरोबर करार केला आहे.

पाकिस्तान

पीसीबीच्या म्हणण्यानुसार, सर्व सहा फ्रॅन्चायझींनी 1 जूनपासून सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी ऑनलाईन बदली म्हणून परदेशी खेळाडूंची निवड केली आहे.  टी -20 क्रिकेटचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू रसेल क्वेटा ग्लेडिएटर्स च्या संघात टॉम बॅटनची जागा घेईल, तर रशीद खानच्या जागी शाकिब अल हसन लाहोर कलंदरमध्ये सामील होईल.

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज कॉलिन इंग्रामच्या जागी न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलचा कराची किंग्जने संघात समावेश केला आहे.

 पाकिस्तान

उस्मान ख्वाजा, जो बर्न्स, जेम्स फॉल्कनर, कॅलम फर्ग्युसन हे चार ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील बदली म्हणून निवडल्या गेलेल्या 19 खेळाडूंच्या यादीत आहेत. पेशावर जल्मी, ग्लेडीएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांनी यापैकी एका खेळाडूची निवड केली आहे आणि नंतर त्याचे नाव निश्चित केले जाईल.

मार्चच्या सुरुवातीच्या 14 सामन्यांनंतर कोरोनाचा वाढता उद्रेक झाल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. या स्पर्धेचे उर्वरित 20 सामने आता 1 जूनपासून पुन्हा खेळले जातील.  सर्व सामने कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

मुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली संधी…..!

वाढत्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी रोज पिऊ शकता अॅपल स्मूदी; अशी आहे रेसिपी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here