आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

सचिन तेंडुलकरला वडापावसोबत हे पाकिस्तानी खाद्यपदार्थ खायला आवडतात…!


 

बॉलीवूडमधले स्टार असो अथवा क्रिकेटमधील खेळाडू आपल्या डायटवर ते भरपूर लक्ष देत असतात. आपल्याला असे वाटते की हे सेलिब्रिटी आणि खेळाडू बाहेरच्या देशातील खाद्यपदार्थ  खाण्याला पसंत करतात मात्र तसे नाही. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी चटपटीत आणि तेलकट खाद्यपदार्थ खाण्यावर ते कटाक्षाने टाळत असतात.

 

आज आपण सचिन तेंडुलकरला कोणते खाद्यपदार्थ आवडतात याची माहिती जाणून घेऊया. सचिन तेंडुलकर हा देखील एक चांगला खवय्या आहे. तो डायटकडे विशेष लक्ष देतो. मुंबईचा वडापाव हा त्यांचा विशेष खाद्यपदार्थ आहे. तो फार चवीने खातो.

सोशल मिडीया अकाउंटवर फोटो शेअर करत त्याने याची माहिती देऊन खुलासा केला होता की त्याला स्नॅक्समध्ये वडापाव खूप आवडतो. आपला हा आवडता खाद्यपदार्थ सचिन बऱ्याचदा स्वतः बनवतो. वडापाव स्वतः बनवून खायला त्याला फार आवडते.

सचिन तेंडुलकर

यासोबतच सचिनला पाकिस्तानी खाद्यपदार्थांमधील कीमा पराठा आणि लस्सी देखील खूप आवडते. तसेच, तो सी फूड शौक म्हणून खातो. मराठी खाद्यपदार्थांमधील दालचावल  हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे.

 

नुकतंच सचिन तेंडुलकरने त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. यातून तो सहीसलामत बरा झाला. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्याने इतरांना प्लाझ्मा डोनेट करण्याचे आवाहन केले होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here