आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

स्टायलिश फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमध्ये ठोकलेत 500 चौकार: अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज


चेन्नई सुपरकिंग्जचा स्टायलिश डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने आयपीएलमध्ये 500 चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा फलंदाज बनला आहे. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम रचला.

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात रैनाने 15 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. ज्यात खणखणीत तीन चौकारांचा समावेश होता. रैनाच्या नावावर आता आयपीएलमध्ये एकूण 502 चौकाराची नोंद झाली आहे. यासह आता तो कर्णधार विराट कोहलीच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

सुरेश रैना

कोहलीने आयपीएलमध्ये 521 चौकार ठोकले आहेत.  फलंदाजांच्या यादीमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत भारताचा डावखुरा फलंदाज शिखर शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे. ज्याने  624 चौकार ठोकले आहेत तर दुसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे त्याने 525 चौकार लगावले आहेत.

 

रैनाने 199 सामन्यातील 194 डावात हा विक्रम रचला आहे. त्याच्या नावावर 202 षटकारांची नोंद आहे. मागील वर्षी त्याने अांतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली आहे.

 

क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी त्याचा फॉर्म मात्र कायम आहे. धोनीचा यंदाचे हे शेवटचे आयपीएलचे वर्ष असू शकते, असे क्रिकेट समीक्षकांना वाटते. धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नई सुपरकिंग्जची कमान सुरेश रैनाच्या खांद्यावरती येऊ शकते, असे म्हटलं जात आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… “गनिमी कावा म्हणजे काय रे भाऊ?”

मुंबई इंडियन्सच्या या नेट बॉलरला आरसीबीने केन रिचर्डसनच्या जागी दिली संधी…..!

वाढत्या वजनावर कंट्रोल करण्यासाठी रोज पिऊ शकता अॅपल स्मूदी; अशी आहे रेसिपी 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here