आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

‘पृथ्वी’ मोलाची! दिल्ली कॅपिटल्सचा केकेआरवर सात गडी राखून विजय….


 

आयपीएल 2021 मध्ये गुरुवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला. दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या जोडीने अतिशीची फलंदाजी करताना दिल्लीला सात गडी राखून विजय मिळवून दिला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिलने 43 धावांची शानदार खेळी साकारली. गिल 38 चेंडू खेळला. यात तीन चौकार आणि एक षटकार ठोकले.

पृथ्वी

केकेआरच्या आंद्रे रसेलनेही वेगवान 27 चेंडूत 45 धावा केल्या. रसेलने एक शानदार षटकार आणि चार खणखणीत ठोकले. कोलकाता नाईट रायडर्सच्या राहुल त्रिपाठीने 19, नितीश राणाने 15 धावा केल्या.  20 षटकांच्या अखेरीस, सहा गडी गमावून 154 धावा.

दिल्लीच्या सलामीच्या जोडीने केला चमत्कार

लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या दिल्लीच्या सलामीवीरांनी शानदार कामगिरी बजावली. पृथ्वी शॉने 41 चेंडूत 11चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 82 धावा फटकावल्या तर शिखर धवनने 47 चेंडूंत 1 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने 46 धावा जोडल्या. दिल्ली कॅपिटल्सने 16.3 षटकांत तीन गडी गमावून 156 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्सने तिन्ही विकेट घेतल्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

सचिन तेंडुलकरला वडापावसोबत हे पाकिस्तानी खाद्यपदार्थ खायला आवडतात…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here