आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

क्विंटन डीकॉक चा धमाका! मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय


 

आयपीएलच्या 14 व्या सत्रातील 24 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचकारी सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या क्लिंटन डी कॉकने 50 चेंडूत 70 धावांची शानदार खेळी केली.

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणार्‍या राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 171 धावा केल्या.

क्विंटन डीकॉक

जोस बटलरने 32 चेंडूत 41 धावा फटकावल्या. त्याचवेळी यशस्वी जयस्वालने 32 धावांची खेळी साकारली. त्याचवेळी संजू सॅमसनने 27 चेंडूत 42 धावा फटकावल्या. मुंबईकडून राहुल चहरने 2, तर बुमराह व बोल्टने 1-1 गडी बाद केले.

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघाने शानदाे सुरवात केली. सलामीवीर क्लिंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी वेगवान धावा केल्या.  क्लिंटन डी कॉकने 50 चेंडूत 70 धावा केल्या आणि शेवटपर्यंत तो बाद झाला नाही.  मुंबईने 18.3 षटकांत तीन गडी गमावून 172 धावांनी विजय मिळविला.

रोहित शर्माने 14, सूर्य कुमार यादवने 16 आणि कुणाल पंड्याने 39 धावा केल्या. कायरन पोलार्डने 8 चेंडूत षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा केल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here