आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

पहिल्याच षटकात सहा चौकार मारणारा पृथ्वी ठरला पहिला खेळाडू : 18 चेंडूंत ठोकले दमदार अर्धशतक


 

खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघातून बाहेर पडलेला 21 वर्षीय पृथ्वी शॉ, आयपीएल 2021 मध्ये शानदार कामगिरी करत आहे. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत असून केकेआरविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकले. या मोसमात त्याचे हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. दिल्लीकडून वेगवान अर्धशतक झळकाविण्याच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. दिल्ली संघाने चालू मोसमात चांगली सुरुवात केली आहे.

पृथ्वी

दिल्लीच्या डावाच्या पहिल्या षटकात पृथ्वी शॉने शिवम मावीच्या एका षटकात सहा चौकार ठोकले.  शॉ पहिल्याच षटकात असे करणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी 2012 च्या राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अजिंक्य रहाणेने एका षटकात 6 चौकार ठोकले. त्याने हे आरसीबीविरूद्ध डावतील 14 व्या ओव्हरमध्ये श्रीशांत अरविंद या गोलंदाजविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्या सामन्यात रहाणेने नाबाद शतकही केले. याशिवाय 2013 मध्ये ल्यूक राइटनेही एका षटकात 6 चौकार ठोकले होते.

केएल राहुलच्या नावावर वेगवान अर्धशतकाची नोंद

आयपीएलमधील वेगवान अर्धशतकाचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे. 2018 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने हा विक्रम केला होता. 18 चेंडूंत त्याने हे अर्धशतक ठोकले होते. आयपीएलचा 45 वा सामना खेळत असलेले पृथ्वीचे हे 9 वे अर्धशतक आहे. 82 धावा काढून तो बाद झाला.

पृथ्वी

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाज करत निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 154 धावा केल्या.

कोलकाताकडून शुभमन गिलने 43 धावा केल्या तर आंद्रे रसेलने अखेरच्या षटकांत 27 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 48 धावांची नाबाद खेळी साकारली.  दिल्लीकडून अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी प्रत्येकी दोन, तर अवेश खान आणि मार्कस स्टोयनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

सचिन तेंडुलकरला वडापावसोबत हे पाकिस्तानी खाद्यपदार्थ खायला आवडतात…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here