आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सोशल मीडियातले स्टेटस आपल्याला ठरु शकतात घातक: कारण चोर झालेत हायटेक; वाचा सविस्तर माहिती


 

एकीकडे लोकांमध्ये सोशल मिडियाची क्रेझ आहे, तर दुसरीकडे हायटेक चोर! क्रेजी किया रे ओ बेबी क्रेजी किया रे! या गाण्याचे हे प्रारंभिक शब्द सत्य सांगत आहेत. कारण सोशल मीडियाचा ज्वर लोकांच्या इतक्या डोक्यात चढला आहे की, प्रत्येकजण वेडा झाला आहे.

स्मार्ट फोनच्या आगमनाने लोक फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहेत. प्रत्येकास आपला फोटो टाकण्याची आणि स्टेटस अपडेट करण्याची क्रेझ आहे.

सोशल मीडिया

पण तुम्हाला त्याचे हे दुष्परिणाम माहित आहेत का?

आपल्याला माहित आहे काय की हे स्टेटस आपल्याला लुटू शकते? सोशल मीडियाची ही क्रेझ आपल्याला महाग पडू  शकते. बंदिस्त खोल्यांचे कुलूप तोडणारे चोर आता हायटेक चोर बनले आहेत. पूर्वी त्यांना चोरी करण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावर भटकंती करावी लागत असे, परंतु आता त्यांचे चोरी करण्याचे काम सोपे झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरटे आता कुठले घर रिकामे आहे हे शोधण्यासाठी कोणत्याही सायबर कॅफेमध्ये बसतात. सायबर कॅफेद्वारे ते शोधतात की कोणत्या ठिकाणी ते सहज चोरी करू शकतील. सोशल मीडियाची क्रेझ इतकी आहे की आम्ही आमच्या सर्व वैयक्तिक गोष्टी त्या स्टेटसला ठेवतो. हे “ऑन हॉलिडे”आउट ऑफ़ मुंबई”  सारखे पोस्ट आणि सबुत म्हणून त्यांचे फोटो आपण अपलोड करतो.

… आणि त्याचा हायटेक चोरटे घेतात फायदा

सोशल मीडिया

उन्हाळी  सुट्टी सुरू झाली आणि बहुतेकजण आपापल्या गावी व आपल्या देशाकडे रवाना होतात.परंतु आम्ही आपणास विनंती करतो की, आपण जाणीवपूर्वक आपले वैयक्तिक जीवन सोशल मीडियावर सार्वजनिकपणे प्रकट करू नये. अन्यथा चोर हायटेक झाले आहेत. हे चोरट्यांसठी एकप्रकारचे आमंत्रण. या आणि आपल्याला लुटून जा. यानंतर दु:खाशिवाय आपल्याकडे काहीही राहणार नाही.

इतकेच नाही तर हा संदेश तुमच्या परिसरातील, तुमच्या समाजातील लोकांना कळवा. जेणेकरून आपले कुटुंब तसेच आपला समाजही सुरक्षित राहू शकेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here