आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…


 

कर्णधार लोकेश राहुलने नाबाद 91 धावा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीत बरार यांच्या शानदार गोलंदाजीमुळे पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शुक्रवारी 34 धावांनी पराभव केला.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाबने 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 179 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती, पण त्या प्रत्युत्तर म्हणून बंगळुरूचा संघ आठ विकेट्सवर 145 धावा करू शकला.

या सामन्यात पंजाबचा फलंदाज निकोलस पूरन पुन्हा एकदा खाते उघडू शकला नाही. वेगवान गोलंदाज काइल जेमिसनच्या गोलंदाजीवर शहाबाज अहमदच्या हाती झेलबाद झाला आणि त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस हा यष्टीरक्षक फलंदाज असून तो पंजाबच्या संघात मधल्या फळीत खेळतो.

 निकोलस पुरन

त्याचा फॉर्म हा पंजाबसाठी चिंतेचा विषय बनला आहे. चार सामन्यांत तो शून्यावर बाद झाला आहे, तरीही संघव्यवस्थापन त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी देत आहे. याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

वस्तुतः निकोलस पूरन हा आयपीएलच्या कोणत्याही एका मोसमात बहुधा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत  संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. पूरन आयपीएल 2021 मध्ये चार वेळा खाते न उघडता माघारी परतला. त्यांच्या अगोदर हर्षल गिब्स, मिथुन मिन्हास, मनीष पांडे आणि शिखर धवन यांच्या नावांवर या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

निकोलस पूरनने या मोसमात आतापर्यंत 0, 0, 9, 0, 19 आणि 0 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये यंदा सर्वच कॅरेबियन खेळाडू परफॉर्मन्स हा समाधानकारक नसल्याचे दिसून येते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here