आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘ट्री मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे डॉक्टर संतोष गुजरे.!


 

झाडांवर प्रेम करणारे गुजरे डॉक्टर हे गेल्या १८ वर्षांपासून स्व:खर्चातून वृक्षलागवड करतात इतकेच नाही तर ते आपल्या
घरगुती कार्यक्रमातील खर्च टाळून झाडे खरेदी करतात.

मानवी जीवनात झाडांना खूप महत्त्वाचं स्थान आहे.

new google

सध्याच्या कोरोना काळात झाडांचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. सोशल मिडीयावर तर झाडे लावा हा मौलिक सल्ला लोक एकमेकांना देत आहेत. कारण झाडं ही माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं अाहे. याची जाण ठेवून केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही एक डॉक्टर प्रयत्न करत अाहेत. ही कहाणी आहे संतोष गुजरे या डॉक्टरांची.

संतोष गुजरे

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अनगर गावचे रहिवासी असलेले संतोष गुजरे हे पेशाने डॉक्टर आहेत. आपला प्रचंड व्यस्त असलेला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ते पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी परिश्रम घेताहेत. ४८ वर्षीय डॉ संतोष गुजरे वृक्ष यांना वृक्षलागवडीची प्रचंड आवड. एमबीबीएस आणि डी एमआरई चं शिक्षण घेतल्या नंतर ते गेल्या २३ वर्षांपासून अनगर येथे वैद्यकीय सेवा बजावत आहेत. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. येथील परिसर हा प्रचंड हिरवाईने नटलेला.

 

या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यांना शिक्षणानंतर आपल्या गावी परत यावेसे वाटत नव्हते. पुढे त्यांनी अशीच हिरवाई आपल्या गावाकडे निर्माण करायचे असा चंग बांधला आणि सोलापूर गाठले. गावतच अोम नावाचे हॉस्पिटल सुरू करुन रुग्णांची सेवा करू लागले. लग्नानंतर त्यांना प्रिया नावाची मुलगी झाली.

 

मुलीच्या जन्माचे स्वागत त्यांनी झाड लावून केलं. पुढे त्यांनी वृक्ष लागवडीचे चळवळ हाती घेतली. दरवर्षी पावसाळ्यात झाडे लावू लागले. गेल्या पाच वर्षांत या वृक्षलागवड चळवळीला वेग दिला. यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग वृक्षलागवडीसाठी खर्च करू लागले.

 

डॉक्टरांनी आपल्या मुलीच्या नामकरणतील आणि वाढदिवसाचा खर्च त्यांनी वृक्षलागवडीवर खर्च केला. अाजही ते आपल्या घरातील कार्यक्रमाचा खर्च झाडांवर खर्च करतात. स्वत:च्या पैशातून त्यांनी झाडे खरेदी करून रस्त्याच्या कडेला जिथे जागा दिसेल तिथे त्यांनी झाडे लावली.

 

झाडे जगावे यासाठी लोखंडी ट्रीची देखील व्यवस्था केली. झाड जळू नये यासाठी त्यांनी टँकरने पाण्याची व्यवस्था केली. यासाठी लाखो रुपये खर्च केले. आज याच परिसरात बहुसंख्य झाडे डेरेदार पणे उभे आहेत. याचे श्रेय डॉक्टर क्टरांना जाते. येथील ग्रामसेवक सचिन कदम हे डॉक्टरांच्या कामी मदत करतात.

 

डॉक्टरांचे झाडावरचे प्रेम पाहून अनेक समविचारी मित्र त्यांच्या या चळवळीत सहभागी झाले. काही डॉक्टर मित्रांनी त्यांना वृक्षलागवडीसाठी झाडे उपलब्ध करून दिली. यातील काही झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावली तर काही झाडे त्यांनी वृक्षप्रेमी लोकांना देऊन टाकले, पण तेही ते झाड लावणार आणि जगवणार या अटीवर.

 संतोष गुजरे

 

वृक्षलागवडीसाठी डॉक्टरांनी चिंच, वड गुलमोहर आणि आंब्याची झाडे निवडली. कारण सावली देणारे आणि फळ देणारी झाडे लोक चांगली जपतात हा त्यांचा अनुभव आहे. डॉक्टरांचे झाडावरचं हे अफाट प्रेम पाहून त्यांच्या वाढदिवसाला आणि कार्यक्रमाला लोक झाडेच भेट म्हणून देतात.

रुग्णांना सांगतात वृक्षलागवडीचे महत्त्व.

 

डॉक्टरांनी झाड लावणे आणि संगोपन करुन थांबले नाही, तर आपल्या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांना झाडांचे महत्त्व नेहमी सांगतात. वृक्षलागवड संदर्भात जनजागृती करणे हा त्या पाठीमागचा हेतू. कुठल्याही प्रसिद्धीविना हे काम अथकपणे सुरू आहे. वृक्षधर्म जोपासणाऱ्या या डॉक्टरांची ओळख आज ‘ट्री मॅन’ म्हणून होत आहे. वैद्यकीय पेशात माणसाच्या वेदना कमी करण्यासोबतच वृक्षांसारख्या सजीव घटकाला देखील त्यांनी जीवन देण्याचं काम करणार्‍या डॉक्टरांना सलाम.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here