आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सामना हरल्यानंतर बाद करणाऱ्या गोलंदाजाची विराट कोहलीने घेतली भेट: व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सकडून कौतुक…


विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पंजाब किंग्जकडून 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.  यासह आरसीबी पॉईंट टेबलमध्ये तिसर्‍या स्थानावर पोहोचला.  पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक नाबाद 91 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीने आरसीबीकडून सर्वाधिक 35 धावा केल्या. कोहलीला हरप्रीत बरारने बोल्ड केले.

कोहली हा बरारचा आयपीएलमधील पहिला बळी ठरला. या विजयानंतर, बरार म्हणाला की, विराट कोहलीला बाद करुन आयपीएलची पहिली विकेट मिळाल्याने मला आनंद झाला आहे. त्याला हा क्षण बराच काळ आठवेल. सामना संपल्यानंतर कोहली बरारची भेट घेत त्याच्याशी बोलला. कोहली आणि बरार यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहली

कोहलीने बरारचे कौतुक केले. या सामन्यात पंजाब संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या, त्यानंतर आरसीबीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 145 धावा करू शकला.  कर्णधार कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या रूपात बरारने तीन मोठ्या विकेट्ससह पंजाबचा विजय जवळजवळ निश्चित केला होता.

यापूर्वी त्याने 17 चेंडूत 25 धावांची नाबाद खेळीही केली.  या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.  बंगळुरूने या मोसमात 7 सामन्यांमध्ये दुसरा पराभव पत्करावा लागला, तर पंजाबने तितक्याच सामन्यांमध्ये तिसरा विजय नोंदविला. गुणतालिकेत पंजाब संघ 6 गुणांसह 5 व्या स्थानावर आहे तर बंगळुरूचा संघ 10 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here