आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

रोहित-कोहली नव्हे तर ‘या’दहा खेळाडूंनी आयपीएलमध्ये ठोकलंय सर्वात वेगवान अर्धशतक….!


===

शनिवारी आयपीएल 2021 मध्ये झालेला सामना अत्यंत रोमांचक होता. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जकडून विजयाचा घास हिरावून घेतला आणि चार गडी राखून पराभव केला. मुंबईच्या कायरन पोलार्ड नावाच्या तुफानसमोर संपूर्ण चेन्नई संघ गुडघे टेकताना दिसला. त्याने 34 चेंडूत नाबाद 87 धावा केल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिला.

वेगवान अर्धशतक

यासह, या मोसमात आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. आज आम्ही तुम्हाला सांगूया, आयपीएलच्या इतिहासात कोणत्या खेळाडूंकडे सर्वात वेगवान फिफ्टी होती?

केएल राहूल

आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान 50 धावा करण्याचा विक्रम भारतीय खेळाडू केएल राहुलच्या नावावर असून त्याने 14 चेंडूंमध्ये हा पराक्रम केला. आयएस बिंद्रा स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध त्याने 8 एप्रिल 2018 रोजी सर्वात वेगवान 50 धावा केल्या. या सामन्यात त्याने 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.

युसुफ पठाण

या यादीत दुसर्‍या क्रमांकावर युसुफ पठाण आहे. त्याने 24 मे 2014 रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने या खेळीत 7 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या.

सुनील नरेन

केकेआरच्या सुनील नरेनने एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध त्याने 15 चेंडूंमध्ये हे कामगिरी केली. 7 मे 2017 रोजी त्याने बेंगळुरूविरुद्ध 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.

सुरेश रैना

मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैना तुम्हाला प्रत्येक विक्रमांच्या यादीमध्ये नक्कीच सापडतील.  आयपीएलमधील वेगवान 50 धावां करण्याच्या यादीतही तो चौथ्या क्रमांकावर आहे. 30 मे 2014 रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध त्याने 16 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या या डावात त्याने 6 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.

ख्रिस गेल

युनिव्हर्सल बॉल ख्रिस गेलनेही एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर 23 एप्रिल 2013 रोजी 17 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.  आरसीबीकडून खेळताना त्याने या डावात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा केल्या. गेलने 17 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 175 धावा केल्या होत्या.

हार्दिक पंड्या

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनेही 28 एप्रिल 2019 रोजी ईडन गार्डन्सवर केकेआरविरुद्ध 17 चेंडूत 50 धावा केल्या.या खेळीत त्याने 9 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 91 धावा फटकावल्या.

कायरन पोलार्ड

कायरन पोलार्डने 1 मे 2021 रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने 17 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 87 धावा केल्या.

अ‍ॅडम गिलक्रिस्ट

दक्षिण आफ्रिकेच्या सुपरस्पोर्ट्स पार्क येथे 22 मे 2009 रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध अ‍ॅडम गिलक्रिस्टने 17 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या.

वेगवान अर्धशतक

ख्रिस मॉरिस

ख्रिस मॉरिस या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूने 27 एप्रिल 2016 रोजी 17 चेंडूत 50 धावा केल्या.  मॉरिसने हा पराक्रम दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केला, ज्यामध्ये त्याने 8 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.

निकोलस पूरन

पंजाब किंग्जच्या निकोलस पूरनला या मोसमात अद्याप चांगली खेळी करता अाली नसेल, पण गेल्या वर्षी त्याने दुबईमध्ये 17 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याने हे काम 8 ऑक्टोबर 2020 रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केले होते. या खेळीत त्याने 7 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here