आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

कायरन पोलार्डचे वेगवान अर्धशतक: आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज


 

.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2021 चा 27 वा सामना खेळला. 20 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर 6 गडी गमावून मुंबईने 219 धावांचे विशाल लक्ष्य गाठले.  मुंबईकडून कायरन पोलार्डने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

कायरन पोलार्ड

तसेच 34 चेंडूत 87 धावांची जोरदार खेळी करताना 8 षटकार आणि 6  चौकार ठोकले.

या खेळीच्या जोरावर त्याने सामना बदलला. पोलार्डशिवाय क्विंटन डी कॉकने 38 आणि रोहित शर्माने 35 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक तीन बळी घेतले.

कायरन पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतकांसह आयपीएल 2021मध्ये नवा विक्रम केला. या मोसमातील तो सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.  त्याने 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.  या हंगामाच्या सुरूवातीस दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉने 18 चेंडूत पन्नास धावा केल्या. त्याने हे अर्धशतक कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध केले आहे.

 

आयपीएलच्या इतिहासात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे. दिल्लीत 2018 मध्ये 14 चेंडूत अर्धशतक ठोकत त्याने हा विक्रम केला. राहुलने 2014 मध्ये युसुफ पठाणचा सर्वात वेगवान 15 चेंडूंत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम मोडला. सुनील नरेनच्या नावावरही 15 चेंडूत पन्नास धावा करण्याचा विक्रम आहे.

 

तत्पूर्वी, फाफ डुप्लेसिस (50) आणि मोईन अली ( 58) यांच्या शतकी भागीदारीनंतर शनिवारी इंडियन प्रीमियर लीग सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स विरुद्ध प्रथम फलंदाजी केली. अंबाती रायुडूच्या नाबाद 72 धावांच्या खेळीमुळे संघाने  218 धावा केल्या. रायडूने 20 चेंडूत 20 वे अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने  चार चौकार आणि सात षटकार ठोकले. चेन्नई संघाने 2008 नंतर प्रथमच मुंबईविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावा केल्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here