आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

 मयंक अगरवालची झुंझार खेळी व्यर्थ: दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जवर एकतर्फी विजय


 

आयपीएलच्या 29व्या सामन्यात पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्सने 14 चेंडूंनी 7 गडी राखून पराभूत करून अव्वल स्थानावर आला. मयंकने सुरुवातीपासूनच एक टोक धरुन खेळत होता. त्याने 58 चेंडूंचा सामना करताना आठ चौकार आणि चार षटकार ठोकले. त्यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर पंजाबला अखेरच्या सहा षटकांत 76 धावा आणि एकूण 6 गडी राखून 166 धावा करता आल्या. शिखर धवनच्या नाबाद 69 धावांच्या पुढे मयंक अगरवालच्या नाबाद 99 धावा फिक्या पडल्या.

 दिल्ली कॅपिटल्स

धवनने पुन्हा एकदा पृथ्वी शॉ (22 चेंडूत 39 धावा, तीन चौकार, तीन षटकार) च्या सहाय्याने दिल्लीची चांगली सुरुवात केली.  डाव्या हाताच्या फलंदाजाने शेवटपर्यंत मेेैदानात टिकून राहिला आणि त्याच्या खेळीत त्याने 47 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि दोन षटकार ठोकले.

यासह दिल्लीने 17.4 षटकांत तीन गडी गमावून 167 धावा करुन आपला सहावा विजय नोंदविला.  या विजयासह दिल्लीने आठ सामन्यांत 12 गुण मिळचले असून चेन्नई सुपर किंग्जला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.

दिल्लीपुढे पंजाबने आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते, परंतु सलामीवीर खासकरुन शॉने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत होता. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ख्रिस जॉर्डनची शॉने खास धुलाई केली, ज्यामुळे दिल्लीने पहिल्या सहा षटकांत 63 धावा केल्या. शॉ ला बाद करत हरप्रीत बरारने मात्र लवकरच पंजाबला मोठा दिलासा दिला.

 

त्यानंतर धवन आणि स्टीव्ह स्मिथ (22 चेंडूत 25) यांनी स्कोअर बोर्ड चालू ठेवला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. स्मिथने मिडविकेटवर उभे अलेल्या डेव्हिड मलानच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याला रिले मेरेडीथने बाद केले.

दिल्ली कॅपिटल्स

धवनने लेगस्पिनर रवी बिश्नोईला षटकार मारुन आयपीएलमध्ये आपले 44 वे अर्धशतक पूर्ण केले. शमी जेव्हा गोलंदाजी करण्यास आला तेव्हा रिषभ पंतने षटकार ठोकून त्याचे स्वागत केले. वेगवान धावा करण्याच्या नादात रिषभ पंत चौदा धावा करून माघारी परतला. परंतु शिमरॉन हेटमायर (4 चेंडूंत नाबाद 16) त्याने मेरिडथच्या पुढच्या षटकात सलग दोन षटकार आणि चौकारांसह संघाला सहज विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जला राहुलची कमतरता साफ दिसून आली. पोटदुखीच्या त्रासामुळे तो पुढचे काही सामने खेळू शकणार नाही. पहिल्यांदा प्रभासिमरण सिंग (16 चेंडूंत 12) आणि त्यानंतर ख्रिस गेल (9 चेंडूंत 13) यांना बाद करून कॅगिसो रबाडाने (36 धावांत 3 बाद) याचा फायदा उठविला.  पॉवरप्लेमध्ये पंजाबला दोन विकेट्सवर 39 धावा करता आल्या. रबाडा आणि ख्रिस गेल या धुरंधर खेळाडूंमध्ये रबाडाने गेल ला बाद करत बाजी मारली.

आयपीएलमधील पहिले सामने खेळणार्‍या मयंक आणि डेव्हिड मलान यांना दिल्लीचे फिरकीपटू अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी नियंत्रणात ठेवले. जगातील पहिल्या क्रमांकाचा टी -20 फलंदाज मलान निकोलस पुरनच्या जागी संघात खेळताना फक्त 26  धावा करु शकला. त्याने इशांत शर्माला षटकार ठोकला पण अक्षरला मोठा फटका मारण्याच्या नादात क्लीन बोल्ड झाला.

दीपक हुड्डा धावबाद झाला, त्यामुळे पंजाबची समस्या वाढली.  14 व्या षटकात पंजाबची धावसंख्या चार विकेटसाठी 90 धावा होती. यानंतर मयंकने आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली. त्याने रबाडावर मिडविकेटवर षटकार ठोकला आणि त्यानंतर इशांतला चौकार मारुन आपले अर्धशतक पूर्ण केले.

शतक पूर्ण करण्यासाठी मयंकला अवेश खानच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती पण तो फक्त चौकार ठोकू शकला. यापूर्वी त्याने दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकले होते. आयपीएलमधील तो सहावा फलंदाज आहे ज्यांचा डाव 99 धावांवर संपला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here