आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

नोकरीकरते वेळेस त्यांच्याकडे होते फक्त 39 रुपये,आज चीन मध्ये आहे 8 करोड रुपयांचा व्यवसाय…


 

.

आपली पहिली नोकरी सुरू करण्याच्या वेळी 39 रुपयांच्या बँक बॅलन्स असल्यापासून चीनमध्ये आठ करोड रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या एलईडी निर्माण श्रृंखला सुरू करणारे भारतीय  जितेंद्र जोशी यांनी खुप लांब प्रवास केला.

आज जितेंद्रचे चीनमधील कारखान्यांमध्ये इन्डोर ऐंड आउटडोर एलईडी डिस्प्ले, एलईडी कर्टन्स, ट्रांसपैरेंट एलईडी वाल्स,एलईडी डिस्प्ले कियोस्क, एलईडी स्क्रीन वैन्स आणि अन्य उत्पादांचे निर्माण केले जाते.खाड़ी, ब्रिटेन, अमेरिका,भारत व अन्य एशियाई देशांमध्ये याला निर्यात केले जाते.

new google

व्यवसाय

चीनमध्ये त्यांचे 400 शहरांमध्ये ग्राहक आहेत. वैश्विक यश संपादन करणारे जितेंद्र म्हणतात, आम्ही चीनमध्ये वार्षिक आठ हजार मीटर वर्ग एलईडी चे निर्माण करतो. परंतु 1997 पासून राजकोट मध्ये वसलेले 39 वर्षीय व्यवसायिक जितेंद्र कधी काळी एक हजार रुपये महिना पगारावर रबर स्टॅम्प विकण्याचे काम करत होते.

मुंबईमध्ये 1978 मध्ये मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्मलेले जितेंद्र यांनी आपले शिक्षण गुजरात मधील मोरवी मध्ये केले. तीन आपत्यामध्ये ते एकटेच मुलगा होते परंतु त्यांच्या वडिलांनी कधीही त्यांचा पक्ष घेतला नाही.

त्यांची स्थिती तेव्हा जास्तच बिघडली जेंव्हा ते आपल्या वर्गातील मुलगी चंद्रिकाच्या प्रेमात पडले. चंद्रिका बारावी पास झाल्यानंतर मेडिकल क्षेत्राशी जोडली गेली. परंतु जितेंद्र बारावी मध्ये फेल झाले आणि 1994 ला मुंबईला गेले . तिथे त्यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये डिप्लोमा कंप्यूटर इंजीनियरिंग मध्ये करण्यासाठी प्रवेश घेतला.

परंतु जितेंद्र नियमितपणे कधी कॅम्पुटर क्लासला गेले नाही आणि पेरमा रबर स्टॅम्प कंपनीमध्ये नोकरी करू लागले. जितेंद्र सांगतात मी एक हजार रुपये पगारावर पेरमामध्ये तीन महिने नोकरी केली. त्याच वर्षी जितेंद्र यांनी आपल्या परिवाराच्या विरोधात जाऊन आर्य समाजाचा परंपरेनुसार चंद्रिका सोबत लग्न केले.

जितेंद्र सांगतात तेव्हा आम्ही लग्न करण्याचे ठरवले तेव्हा माझ्यापाशी फक्त एक हजार शंभर रुपये होते. मी चंद्रिका ला 600 रुपये किंमतीची साडी उपहार स्वरूप दिली . 350 रुपये लग्नकार्यासाठी खर्च झाले आणि शेवटी माझ्याकडे फक्त 39 रुपये उरले.

त्यावेळी चंद्रिका आपली मेडिकल इंटर्नशिप करत होती. दीड वर्षांमध्ये ती स्टायपेंड मिळण्यास योग्य होणार होती. परंतु मला माहित होते जीवन जगण्यासाठी चांगली कमाई करण्यासाठी माझ्याकडे एवढाच वेळ होता.जितेंद्र सांगतात आमच्या लग्नानंतर चंद्रिका आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरी वापस गेली. मी माझा डिप्लोमा पूर्ण केला आणि कम्प्युटर सायन्स डिग्रीसाठी नामांकन केले.

व्यवसाय
नियमितपणे कॉलेजला न जाता जितेंद्रने हिंदुस्तान कम्प्युटर्स लिमिटेड मध्ये 1500 रुपये पगारावर नोकरी केली. तिथे त्यांना काम्पुटर सोबत काम करण्याचा अनुभव मिळाला.

 

एचसीएल मध्ये दीड वर्ष काम केल्यानंतर 1997 मध्ये जितेंद्र व्यवसाय करण्यासाठी राजकोटला गेले. तोपर्यंत चंद्रिका चे शिक्षण पूर्ण झाले होते.

जितेंद्रने स्वतःच्या किंवा व्यवसाय सुरु करण्याविषयी सांगितले हातात थोडेच पैसे होते. त्यापासून मी रेडीमेड गारमेंट चा छोटासा व्यवसाय सुरू केला, परंतु याला सहा महीना मध्येच बंद करावे लागले.ते सांगतात 1998 मध्ये कॅम्पुटर व्यवसायामध्ये प्रवेश केला आणि दीड हजार रुपये महिना किरायाने एक दुकान घेतली. त्या दिवसांमध्ये असेंबल कम्प्युटर ची मागणी जास्त होती.

मुंबई मधुन पुर्जे जोडून ते आपल्या दुकानांमध्ये कम्प्युटर असेंबल करत होते आणि एका सिस्टीम वर 10000 ते पंधरा हजार कमावत होते . परंतु दुकानावर जमा उत्पादन शुल्क विभागाचा छापा पडला तेव्हा त्यांच्या खूप नुकसान झाले.
नंतर जितेंद्र आणि रेखा बँकेमधून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि कम्प्युटर मीडिया सर्विसेस सुरू केले. ही एक कंपनी होती जी राजकोटमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध करत होती.

परंतु त्यांची आर्थिक स्थिती तोपर्यंत चांगली नाही झाली जोपर्यंत आणि स्वतःची कंपनी वर्ष 2003 मध्ये ग्लोबल कमुनिकेशन डॉट कॉम की स्थापना नाही केली. त्याच वेळी ते योगगुरु बाबा रामदेव यांच्या संपर्कात आले एका योग कार्यक्रमासाठी राजकोट ला आले होते.

रामदेव यांनी कार्यक्रम दाखवण्यासाठी त्यांचे प्रोजेक्ट केल्याने घेतले होते.त्यानंतर रामदेव यांनी त्यांचा वेगवेगळ्या शिबिरांमध्ये त्यांना साथ देण्यासाठी जितेंद्र यांच्याशी बोलणी केली.

जितेंद्र सांगतात राजकोट मधून चार प्रोजेक्ट पासून सुरुवात करून आम्ही देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात कॅम्प लावले . एका कॅम्पमध्ये जास्तीत जास्त 80 प्रोजेक्ट्स लावले होते. मी उपकरणांना किरायावर देणे आणि व्हिडिओ प्रसारण करणे यासाठी शुल्क घेत असे. पहिल्या वर्षी आम्ही 60 लाख रुपयांचा व्यवसाय केला.

 

जितेंद्र सांगतात आम्ही वर्ष 2008 मध्ये चीनमधून पहिली एलईडी स्क्रीन पंचवीस लाख रुपयांमध्ये आणली होती. मी रामदेव बाबा पासूनच पैसे उधार घेतला होता आणि नंतर त्यांना परत केला . नंतर मी त्यांच्या कार्यक्रमांसाठी एलईडी ट्रकचे निर्माण केली जे खूप यशस्वी राहिले .जितेंद्र यांनी गुजरात सरकारसोबत सुद्धा काम सुरू केले.

व्यवसाय

जितेंद्र यांना समजले होते भारतामध्ये एलईडी चे भविष्य खूप विशाल आहे यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे एलईडी स्क्रीनचे निर्माण स्वतः करायचे. एलजीचा वैश्विक बाजार जवळपास तीन अरब अमेरिकी डॉलर एवढा आहे आणि भारत त्यामध्ये पहिल्या पाच उपभोक्ता पैकी एक आहे.

एलईडी निर्माण क्षेत्राच्या मागे जाण्यामध्ये ते सांगतात, काही मागणी पैकी चीन एक अमेरिकी डॉलर किमतीचे सामान बनवतो. मागच्या वर्षी तीन करोड अमेरिकी डॉलर एवढ्या किमतीचे एलईडी फक्त भारतात निर्यात करण्यात आले .
वर्ष 2014मध्ये जितेंद्रने चीनमधील सेनझेन मध्ये एके एलईडी निर्माण चे कार्य सुरू केले. त्याने पहिल्या वर्षी 500 वर्गमिटर एलईडी निर्माण कार्य केले. या उत्पादनांना प्रामुख्याने भारतात निर्यात करण्यात येत होते.

मागच्या वर्षी जितेंद्रने राजकोट मध्ये 10000 वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये भारताचा पहिला एलईडी निर्माण कारखाना सुरू केला. हेच कारण आहे की राजकोटमध्ये जितेंद्र यांना जादूगार असे म्हटले जाते.एका व्यावसायिकाच्या रूपात ते संतुष्ट आहेत आणि ते सांगतात लवकरच भारतामध्ये याचे कार्य सुरू होईल सर्व कर्मचाऱ्यांना चीनमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी त्यांनी 15 करोड रुपये गुंतवले आहेत.

ते म्हणतात , मला माहित आहे की माझा भारत आता एलईडी निर्माण करण्यापासून जास्त दूर नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here