आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

लग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यात ‘या’ देशातील लोक आहेत पुढे; सर्वेक्षणात झाले स्पष्ट .


जोडीदाराची फसवणूक करण्याच्या बाबतीत आयर्लंड मधील लोक संपूर्ण जगामध्ये आघाडीवर आहेत. कॅनडामधील एका विवाहित डेटिंग साइटच्या सर्वेक्षणात हा खुलासा करण्यात आला आहे. अभ्यासानुसार, आयर्लंडमधील दर पाचपैकी एक (20 टक्के) लोक त्यांच्या जीवन साथीदारांना फसवतात.

जोडीदार

फसवणूक करण्याच्या बाबतीत जर्मनी दुसर्‍या क्रमांकावर आहे.  इथल्या 13 टक्के लोकांनी कबूल केले की, ते दररोज आपल्या पार्टनरची फसवणूक करतात. या जागतिक अभ्यासात कोलंबिया तिसर्‍या (8%), फ्रान्स चौथ्या (6%) आणि यूके पाचव्या (5%) क्रमांकावर आहे.

या विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅपच्या सर्वेक्षणात, बहुतेक लोकांनी हे मान्य केले की प्रेम प्रकरणांबद्दल जाणून घेतल्यानंतरही ते आपल्या जोडीदारास क्षमा करतील. अभ्यासामध्ये, बहुतेक पुरुष आपल्या भागीदारांना फसवणूकीबद्दल समजले तेव्हा त्यांना क्षमा करण्यास तयार होतात.

new google

अभ्यासाच्या आकडेवारीनुसार, फसवणूक झाल्यानंतर बहुतेक स्त्रिया पूर्वीप्रमाणे आंधळेपणाने आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवत नाहीत.  80% पुरुष आणि 85% महिलांना त्यांच्या जोडीदारांनी मागील अफेअरसाठी क्षमा केली आहे.

 

सर्वेक्षणात जेव्हा आपण आपल्या जोडीदारास त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल क्षमा करणार की नाही असे विचारले असता – 86 टक्के पुरुषांनी होय दिले.  तर 82 टक्के महिलांनी नाही असे उत्तर दिले. महिला आणि पुरुषांमधील वैचारिक फरकांवर मानसशास्त्रज्ञांची भिन्न मते आहेत.

जोडीदार

मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, जेव्हा-जेव्हा एखादे प्रेम प्रकरण आढळते तेव्हा पुरुष आपल्या जोडीदाराच्या शारीरिक आसक्तीकडे अधिक लक्ष देतात, तर महिलांना आपल्या जोडीदाराची दुसर्‍या स्त्रीशी किती भावनिक आस असते हे जाणून घेण्यात अधिक रस असतो.

जेव्हा भावनिक फसवणूक केली जाते तेव्हा त्यांना शारीरिक धमकी दिली जाते तेव्हा महिला सहजपणे त्यांच्या पार्टनरला क्षमा  करत नाहीत. अभ्यासानुसार जगभरात लॉकडाऊनचे नियम असूनही प्रेम आणि फसवणुकीचे हे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत.

सर्वेक्षणातील बर्‍याच लोकांनी कबूल केले की, ते एका महिन्यात दोन भिन्न लोकांशी संबंध बनवतात. त्याचवेळी बर्‍याच लोकांनी असेही सांगितले की, त्यांच्या गुप्त साथीदाराबरोबर त्यांचे कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध नाहीत. ग्लोबल स्टडी डेटिंग साइटच्या 3 हजार सभासदांवर हा सर्व्हे केले गेला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here