आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

बीसीसीआयचा मोठा निर्णय: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित


 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.  दोन दिवसांत तीन खेळाडू कोविड -१९ पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  आज सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा कोविड -१९ चाचणीत पॉझिटिव्ह  आढळला. इंडियन प्रीमियर लीग गव्हर्निंग कौन्सिल (आयपीएल जीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आयपीएल जीसी आणि बीसीसीआय यांच्यात बैठक झाली.

आयपीएल

आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर असे लिहिले आहे की, “बीसीसीआय या स्पर्धेशी संबंधित खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका घेऊ इच्छित नाही.  सर्वांचे कल्याण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.  हा एक कठीण काळ आहे आणि विशेषतः भारतासाठी. आम्ही लोकांमध्ये काही सकारात्मकता आणण्याचा आणि त्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा आता स्थगित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सहभागी असलेले सर्व आपल्या कुटुंबात परतू शकतात.”

तत्पूर्वी, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला सांगितले की, आयपीएल 2021 यांना सध्या स्थगित केले गेले आहे. ते म्हणाले की, “आयपीएल 2021 नुकतेच स्थगित करण्यात आले आहे, ते रद्द झाले नाही. ते कधी शेड्यूल केले जाऊ शकते ते पहावे लागेल. यापूर्वी सोमवारी कोविड १९ चाचणीत वरुण चक्रवर्ती आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळून आले होते, त्यानंतर केकेआर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामना पुढे ढकलला गेला.”

आयपीएल

आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत होणार असल्याची बातमी होती, पण कोविड -19 चाचणीत साहा पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत आयपीएलचे एकूण 29 सामने खेळले गेले आहेत.  या तीन खेळाडूंव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) शिबिरातील गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीला कोरोनाची लागण झाली आहे.

आयपीएल 2021 बायो सिक्योर वातावरणात खेळला जात होता. अशा परिस्थितीत खेळाडूंनी कोरोनाची लागण होत असल्याने चर्चेला मोठे उधाण आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे नेता किर्ती आझाद यांनी आयपीएल रद्द करण्याची दोन दिवसांपूर्वी मागणी केली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

सुरेश रैनाची धडाकेबाज खेळी; कोहली-रोहित च्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी! 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here