आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

नशिबाच्या नावाने बोटे न मोडता पायाने चित्र काढणाऱ्या या चित्रकाराने जगापुढे आदर्श मांडलाय…!


 

=====

काही लोक शरीराने धडधाकट असून देखील प्रत्येक गोष्टीत नशिबाच्या नावाने बोटे मोडतात. पण जगात अशी काही माणसं आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये अपंगत्व येऊन देखील त्याचा बाऊ न करता अशक्य गोष्टी शक्य करून दाखवत इतरांपुढे एक मिसाल बनतात.

 चित्रकार

new google

आज आपण अशाच एका झुंजार तरुणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या पायात चित्रकलेची जादू आहे. बंदेनवाज नदाफ असे या अवलियाचे नाव आहे. एक अपंग तरुण ते एक प्रथितयश चित्रकार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

बंदेनवाज नदाफ हा ३१ वर्षीय तरुण मुळचा जिल्ह्यातल्या हत्तूर बस्ती गावचे. सध्या मुंबईमध्ये चांदीवले येथे स्थायिक. जन्म देणाऱ्या विधात्याने त्याला भरभरून दिले. मात्र, त्याचे हात सोडून. तो जन्मजात दिव्यांग असल्याने लोक त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी करायचे. आजीला ही गर्दी खटकायची म्हणून बंदेनवाझला बघण्यासाठी तिने पाच पैशांचे तिकीट ठेवले. तो तीन महिन्यांचा झाल्यावर त्यांचे आई-वडील त्याला घेऊन मुंबईला आले.

पायाच्या बाेटांनी चित्रे काढण्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बंदेनवाज सांगतो, जन्मजात दिव्यांग असल्याने त्याला मुंबईतील अनेक शाळेनी प्रवेश नाकारला. शेवटी एका अपंग मुलांच्या विशेष शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण सुरू केले. सातवीपर्यंत या शाळेत चित्रकला, स्विमिंग अवगत केली. चित्रकलेच्या शिक्षिका वनिता जाधव यांच्यामुळे बंदेनवाझ यांना चित्रकलेतले बारकावे शिकविले.

एक दिवस मला पायांनी चित्र काढताना शाळेच्या ट्रस्टी आणि देणगीदार झरिन चौथिया यांनी बघितले. चित्रकलेची आवड पाहून त्यांनी मला शिकवणी फी भरून भालचंद्र धनू या खासगी शिक्षकांकडे चित्रकलेतील प्राविण्य संपादन करण्यासाठी पाठवले. पुढे मी चित्रांच्या दुनियेत रमून गेलो.

बंदेनवाझ रंगाचा ब्रश पायाच्या बाेटांमध्ये लीलया पकडत रंगाच्या अनाेख्या विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याने काढलेले अप्रतिम चित्र पाहून नजर हटत नाही. दोन्ही हात नसतानाही ही चित्रे काढली आहेत यावर कुणाचा विश्वासच बसत नाही.  दोन्ही हात नसतानाही खचून न जाता चित्रांचा आधार घेत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. स्वतःचे कुटुंब चालवतो.

चित्रकार

सकाळच्या दिनचर्यापासून ते चित्र काढण्यापर्यंत सारी कामे तो स्वत: करतो. तो कधी कोणापुढे मदत मागत नाही. चित्रे काढण्याबरोबरच उत्तम पोहतो. गाडी चालविणे, मोबाइल रिपेअर करणे ही कामे सफाईदारपणे करतो.

पोट्रेट पेंटिंग, अॅक्रिलिक, वाॅटर पेंटिंग, चारकाेल या माध्यमांमध्ये चित्रे काढण्यात त्याचा हातखंडा आहे. बंदेनवाझच्या चित्रांची प्रदर्शने जहांगीर आर्ट गॅलरीतही झाली आहेत. सध्या इंडियन माऊथ अ‍ॅन्ड फूट पेंटर्स असोसिएशनचा कलाकार म्हणून तो काम करतो. स्वत:चे आर्ट गॅलरी उभारण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. संघर्षांची वाटचाल सुरू ठेवत जगण्याची दुर्दम्य प्रबळ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या बंदेनवाज याची कहाणी अनेकांना प्रेरणादायीआहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

पंजाब किंग्जचा फलंदाज निकोलस पुरनच्या नावावर ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद…

लोकप्रियतेत शाहरुख खानला टक्कर देतोय हा दाक्षिणात्य हिरो:  पायलट म्हणून करतोय काम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here