आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

तरुणांनो जरा आदर्श घ्या! 71 वर्षाच्या ‘या’ आजी जिममध्ये करतात तासंतास व्यायाम….!


ज्या वयात वयस्कर लोकांना चालणे फिरणे मुश्कील होऊन जाते, त्याच वयात एक वृद्ध महिला जिममध्ये प्रचंड मेहनत करत आपले शरीर पिळदार बनवत आहे. या आजी ने इंस्टाग्रामवर आपले अकाऊंट खोलले असून जिम करत असतानाचे अनेक व्हिडिओ त्या अपलोड करत असतात.

सोशल मिडीयावर त्यांचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या या जिममधील मेहनतीचे कौतुक होत आहे. व्यायामाचे प्रचंड वेड असलेल्या या 71 वषीय आजीचे नाव मॅरी डफी असं आहे.

 

 व्यायाम

जगातील सर्वांत धष्टपुष्ट मानली जाणारी ही आजी एका आठवड्यात 20 ते 25 तास जिममध्ये व्यायाम करते. ती सांगते की, तीस वर्षांपूर्वीपेक्षा आज स्वत: ला खूपच फिट असल्याचे वाटत आहे. वयाच्या 59 वर्षी तिने वजन कमी करण्यास वेटलिफ्टिंग ची सुरुवात केली. त्यानंतर तिने व्यायामालाच आपले फॅशन बनवले.

या वयात तिने बरेच वजन कमी केले असून तिने 113 किलो वजनासह डेड लिफ्ट, 56 किलो वजनासह बेंच प्रेस आणि स्क्वाट 79 किलो वजन घेऊन करते.

 

दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरलेल्या या आजी तिच्या जवानीच्या दिवसांत जिम आणि व्यायाम करत करायची. पण तिने त्यावेळी त्याला कधी गंभीरतेने घेत नव्हती. सन  2007 पासून तिने वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटची सुरवात केली. आज जिम आणि व्यायाम हा तिच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे.

व्यायामापासून दुरावलेल्या आजच्या तरुण पिढीसाठी या आजीची कहाणी खरोखरच आदर्शवत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे हि वाचा… महाभारतातील या योद्धा आजून जिवंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here