आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चित्रकाराने व्यवसायाच्या नफ्यातून अन्नदानासाठी केली मदत…कोरोना काळात युवकाचा असाही एक आदर्श


 

पूर्व भागातील विश्वविक्रमी युवा चित्रकार व रांगोळीकार निखिल अंबादास तलकोकुल याने कोरोना काळात गरजू लोकांसाठी अनोखे योगदान दिले आहे. आपल्या व्यवसायाच्या नफ्यातून मिळालेली रक्कम अन्नदान्नासाठी दिली आहे. भवानीपेठ परिसरात राहणारा निखिल हा एक व्यावसायिक चित्रकार आहे. लॉकडाऊनकाळात त्याने काही व्यावसायिक चित्रे काढली होती. यातून मिळालेला नफा हा गरजू नागरिकांवर अधिक खर्च केला. शहरातील रॉबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेकडे त्याने ही मदतीची रक्कम सुपूर्द केली आहे.

चित्रकार

हाताने रेखाटलेले निर्जीव चित्र असो वा पेंटिंग त्यामध्ये जिवंतपणा आणण्याची क्षमता चित्रकारामध्ये असते. रेखाटनाचे छंद जोपासणारे अनेक व्यक्तिमत्व समाजात वावरताना दिसून येतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे निखिल तलकोकुल.

निखिलने मागील महिन्यात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याच्या राहत्या घरी अभिवादन रांगोळी रेखाटली होती. या रांगोळीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर नेटीझन्सने त्याच्या कलेचे भरपूर कौतुक केले होते.

निखिलची कलेवर निखळ श्रद्धा. धार्मिक उत्सव असो वा महापुरुषांची जयंती त्याने काढलेल्या रांगोळ्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वी त्याने शिवजयंती निमित्त दयानंद महाविद्यालयात १ हजार स्केवर फूट जागेत छत्रपती शिवरायांनी भव्य रांगोळी काढली होती. गेल्या काही दिवसांपासून आपल्या कलेमार्फत रांगोळी साकारत अनोखा आदर्श अनुयायांपुढे ठेवत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या रांगोळी साकारताना तो कसलाही मोबदला घेत नाही. केवळ महापुरुषांचे स्मरण व त्यांना अभिवादन करणे हाच एकमात्र उद्देश निखिल यातून साध्य करतो.

चित्रकार

निखिल सांगतो, की मला महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक सेवेची आवड आहे. या कोरोना काळात आपलेही योगदान असावे असे मला वाटत होते. म्हणून मी माझ्या व्यवसायाच्या नफ्यातून मिळालेली रक्कम ही गरजूवरती खर्च करण्याचे ठरवले. चित्राच्या माध्यमातून मिळालेली नफ्याची रक्कम गरजू लोकांच्या अन्नदानासाठी मी रॉबिनहूड आर्मीकडे दिली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना अन्नदान करून त्यांची भूक भागवली जाते. सामाजिक भावनेतून ही मदत केलेली आहे. मदतीची रक्कम किती छोटी-मोठी आहे यापेक्षा दानत महत्त्वाची असते.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे हि वाचा… महाभारतातील या योद्धा आजून जिवंत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here