आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू स्टुअर्ट मॅकगिलला गुंडांनी केले किडनॅप: पोलिसांनी 4 जणांना केली अटक


 

ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिलचे गेल्या महिन्यात 14 एप्रिल रोजी सिडनी येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार चार जणांना अटक केली. या सर्वांचे वय 27 ते 46 वर्षांच्या दरम्यान आहे.

 स्टुअर्ट मॅकगिल

पोलिसांनी सांगितले की, न्यू साउथ वेल्समधील 14 एप्रिल रोजी एका चौकाच्या जागी 50 वर्षीय मॅकगिलला एका व्यक्तीने रोखले. त्यानंतर आणखी दोन लोक आले आणि त्यांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये नेले. यानंतर, त्याला निर्जन ठिकाणी नेले आणि मारहाण केली.

1 तासानंतर त्याला सोडण्यात आले. असे सांगितले जात आहे की, मॅकगिलने त्याच्या भावाची लाइफ पार्टनर मारिया ओमेगीरचा भाऊ मारिनो सोतिरोपोलस याच्यावर आरोप लावले आहेत.

स्टुअर्ट मॅकगिल

1988 ते 2008 पर्यंत क्रिकेट खेळले

स्टुअर्ट मॅकगिल ऑस्ट्रेलियाकडून 44 कसोटी सामने खेळला.  या दरम्यान त्याने 208 बळी घेतले.  यासह त्याने 3 एकदिवसीय सामन्यात 6 विकेट्स नोंदवल्या आहेत.  30 मे 2008 रोजी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here