आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पठाण बंधू धावले: दक्षिण दिल्लीतील रुग्णांना देणार मोफत जेवण


 

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेने सर्वाधिक त्रस्त असलेल्या शहरांपैकी एक दिल्ली शहरातील रुग्णालये कोरोना ग्रस्त रुग्णांनी भरली आहेत. येथील परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू पठाण बंधू मदतीला धावून आले आहेत. दिल्ली येथील कोरोनाग्रस्थांसाठी पठाण बंधूंनी आपल्या अकॅडमीमार्फत दक्षिण दिल्ली येथे मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला आहे.

 पठाण

इरफान पठानने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. भारताकडून 29 कसोटी आणि 120 एकदिवसीय सामने खेळलेल्या इरफानला मार्चमध्येच स्वत: ची लागण झाली होती. रायपूर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धा खेळल्यानंतर त्याचा मोठा भाऊ युसूफही पॉझिटिव्ह आढळून आला. माजी अष्टपैलू खेळाडू  इरफान पठाण निवृत्तीनंतर कॉमेंट्री करत होता.

इरफानने ट्विट केले की, “कोरोना साथीच्या रोगाची दुसरी लाट देशभरात सुरू आहे आणि अशा परिस्थितीत गरजूंना मदत करणे आपले कर्तव्य आहे.”  यापासून प्रेरणा घेऊन क्रिकेट अकादमी ऑफ पठाण (सीएपी) दक्षिण दिल्लीतील गरजूंना विनामूल्य भोजन पुरवेल.

 युसूफ आणि इरफान यांनी गेल्या वर्षी देखील सर्व देशभर कोरोना साथीच्या रोगराई दरम्यान 4 हजार मास्क  वितरित केले. भारतात दररोज तीन लाखाहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत, तर दररोज 3 हजार हून अधिक लोक मरत आहेत.

पठाण

कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. अशाप्रसंगी माणुसकी दाखवत काही आजी माजी क्रिकेटपटूंनी देखील मदतीसाठी हात पुढे केला आहे. भारतीय खेळाडूंसोबत परदेशी खेळाडूदेखील भारताला आर्थिक सहकार्य करत आहेत.

मंगळवारी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ म्हणाले की, “युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या विनंतीवरून आपण भारतातील कोरोना संकटात मदत करण्यासाठी काही रक्कम दान करू.” सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 50,000 डॉलर देण्याचे जाहीर केले तर बेहरेनडॉर्फचे सहकारी पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांनीही देणगी दिली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here