Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

श्रीलंकेला टी-20 विश्वचषक जिंकून देणार्‍या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने क्रिकेटला ठोकला रामराम


 

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परेरा 32 वर्षांचा आहे.  त्याने 6 कसोटी, 166 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 84 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतला असला तरी तो जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये तो खेळण्याची शक्यता आहे.

 विश्वचषक

श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) पाठवलेल्या पत्रात परेरा ने लिहिले की, मला वाटते की निवृत्ती घेण्याची आणि युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.”

एसएलसीला लिहिलेल्या पत्रात तो पुढे म्हणाला की, ”मला अभिमान आहे की मी सात क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आणि बांगलादेशात 2014 मध्ये झालेल्या टी -20 विश्वचषकात संघाच्या विजयात मी अापले योगदान दिलो हा माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे.”

विश्वचषक

एसएलसीनेही राष्ट्रीय संघाच्या यशामध्ये परेराच्या योगदानाची मान्य करत कौतुक केले अाहे. एसएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “थिसारा हा एक अष्टपैलू खेळाडू अाहे. त्याने श्रीलंका क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून मोलाचे योगदान दिले आणि देशाच्या उत्कृष्ट क्रिकेट क्षणांमध्ये भूमिका बजावली.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

( हेही वाचा.. दगडांत कोरून तयार केलेल्या या गुफांमध्ये आहेत अनेक देवांचे मंदिरे…!)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here