आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

 

बास्केटबॉल खेळाडूंने उभी केली 300 करोड ची बस कंपनी


 

साल 1964 मध्ये चार टॅक्सी पासून सुरू झालेली ट्रान्सपोर्ट कंपनी आज वार्षिक 300 करोड रुपयांचा व्यवहार करते. ही कंपनी आहे प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड, जिला प्रसन्ना पर्पल या नावानेही ओळखले जाते.
आज कंपनी जवळ  1200 पेक्षा जास्त बस आणि कार आहेत. जे भारतातील 85 शहरांमध्ये चालतात.

new google

यामध्ये कंपनी सातशे बसची मालक आहे.बास्केटबॉल

प्रसन्ना पर्पल चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन्ना पटवर्धन एकेकाळी महाराष्ट्राच्या बास्केटबॉल टीमचे कर्णधार  होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ते आजही त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वातून दिसून येते.

आज प्रसन्ना तीन कंपनी चालवतात त्यात मूळ कंपनी प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड (इंटरसिटी ऐंड सिटी बस पैसेंजर ट्रांसपोर्ट, कॉर्पोरेट ऐंड स्कूल मोबिलिटी, डोमेस्टिक ऐंड इंटरनेशनल हॉलीडे पैकेजेस), आणि दोन सहयोगी कंपनिया , प्रसन्ना ट्रांसपोर्ट नेटवर्क प्राइवेट लिमिटेड (गुड्स ट्रांसपोर्ट) एंड स्माइलस्टोन मोटल्स प्राइवेट लिमिटेड.

या सगळ्यांमध्ये प्रसन्ना पर्पलची पार्टनर आहे अंबित प्रेग्मा‌. ही एक खाजगी इक्विटी कंपनी आहे. तिने प्रसन्ना पर्पल मध्ये 2009 मध्ये गुंतवणूक केली होती आणि ही मूळ कंपनीमध्ये 64% ची मालकिन आहे.

साल 2010 मध्ये प्रसन्ना ट्रॅव्हल्स ला आधुनिक रूप देण्यासाठी नाव बदलून प्रसन्ना पर्पल असे करण्यात आले.

प्रसन्ना यांचा जन्म 1962 मध्ये पुण्यातील एका एकत्रित कुटुंबांमध्ये झाला. परिवारामध्ये 24 लोक एकाच छताखाली रहात होते. त्यांचे पालन पोषण एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांमध्ये झाले .

त्यांनी नूतन मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले आणि फर्गुसन कॉलेज मधून विज्ञान मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सिंबॉयसिस मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

प्रसन्ना सांगतात त्यांच्या वडिलांची एक टॅक्सी सर्विस होती. त्यांचा एक मात्र क्लाइंट पुणे विश्वविद्यालय होते, जेत्यांचा टॅक्सी चा उपयोग प्रोफेसर किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी यांना ने आण करण्यासाठी करत असे. त्यांना त्यापासून ठीक ठाक पैसा मिळत असे.

त्यांचे वडील केशव वामन पटवर्धन महाविद्यालय पुणे चे एक मात्र कॉन्ट्रॅक्टर होते. यामुळे सगळा बिझनेस त्यांच्यापाशीच होता.

साल 1985 मध्ये विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी सगळ्यांना टॅक्सी ऐवजी कारपुल करण्यास सांगितले. त्यांनी सांगितले टॅक्सी तेव्हाच बोलवतील जेव्हा त्यांना गरज असेल. यामुळे त्यांच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला. आता त्यांच्याकडे एकही क्लाइंट नव्हता.

तो प्रसन्ना ट्रॅव्हल्स साठी वाईट काळ होता आणि कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर होती . व्यवसाय ठप्प होण्याचा परिणाम म्हणजे घरची आमदानी संपणार होती.

प्रसन्ना सांगतात तेव्हा मला समजले की मला आता मदत करावी लागेल.

प्रसन्ना नि त्याच वर्षी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. 1985 पासून त्यांनी वडिलांना हातभार लावण्यास सुरुवात केली.
असे नाही की ते फक्त हेच करू इच्छित होते ते बाळ बास्केट बॉल चे उत्तम खेळाडू होते.

बास्केटबॉल

वडिलांच्या बिजनेस मध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी ऑफिसला नवीन रंगरूप दिला आणि फियाट ॲम्बेसिडर सजवली. त्यांच्या मेहनतीने त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली. नवीन केलेल्या सुधारणांमुळे त्यांचा व्यवसाय तिपटीने वाढला. जिथे कंपनीचे 1985 मध्ये वार्षिक उत्पन्नही 3 लाख रुपये होते , ते पुढच्या दहा वर्षांत म्हणजे 1995 साली दहा करोड वर पोहोचले.

साल 1988 मध्ये प्रसन्ना ने पहिली बस सर्विस सुरू केली जेव्हा त्यांनी दहा लाख रुपयांमध्ये पहिली एअर कंडिशनर बस सुरू केली. लवकरच बस सेवा प्रसन्ना ट्रॅव्हल्स ची मुख्य व्यवसाय बनली . सन 2009 मध्ये अंबित प्रेगमा यांनी कंपनी मध्ये गुंतवणूक केली.

साल 1986 मध्ये त्यांचे मोनिका बरोबर लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा सौरभ कंपनीचा कार्गो बिझनेस सांभाळतो. तर दुसरा मुलगा हर्षवर्धन यांची चप्पल बूट निर्माण करण्याची शृंखला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

प्रेरणादायी! पायाने दिव्यांग असलेली ही युवती रिक्षा चालवून आपल्या वृध्द आईवडिलांचा सांभाळ करतेय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here