आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आंध्र प्रदेशच्या या महिला डॉक्टर करतात दहा रुपयांत रुग्णांवर उपचार; लोक प्रेमाने म्हणतात ‘मदर तेरेसा’


 

उपचारांद्वारे रुग्णाला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांचे महत्त्व अनन्यसाधारणच. काळाच्या ओघात डॉक्टरीपेशा बदलला असला, त्याला नवे आयाम लाभले असले, तरी आजही असंख्य डॉक्टर्स सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आदिवासी, तसेच ग्रामीण भागात सुशृषा करणारे, कमी पैश्यात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स आजही कार्यरत आहेत. अशा डॉक्टरांपैकी एक आहेत डॉक्टर नूरी परवीन

डॉक्टर

लॉकडाऊन व साथीच्या रोगांमुळे बर्‍याच डॉक्टरांनी फी वाढविली आहे. पण या समाजात असेही काही डॉक्टर आहेत जे फक्त दहा रुपयांत रूग्णांना सेवा देतात. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या डॉक्टर नूरी परवीन या आंध्र प्रदेशातील कडप्पा शहरातील आहेत. डॉक्टर नूरी या त्याच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना अवघ्या दहा रुपयांत रुग्णांना सेवा देतात. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट जर अॅडमिट असेल तर बेडचे चार्ज म्हणून दिवसाला पन्नास रुपये आकारला जातो.

 

मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या नूरी कडपाच्या फातिमा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या एमबीबीएस आहेत.

अभ्यास संपल्यानंतर नुरीने आपल्या गावी विजयवाड्यात परतल्यानंतरकडप्पाच्या गरीब वस्तीत क्लिनिक उघडले. क्लिनिक उघडल्यानंतर, नुरीने आपल्या निर्णयाबद्दल पालकांना सांगितले की, आपण येथेच राहून गरिबांची सेवा करणार अाहे. यामुळे तिचे पालक खूप आनंदी झाले. त्यांना आपल्या मुलीचा अभिमान आहे.

डॉक्टर

समाजसेवा करण्याचा वारसा तिला कुटूंबातून मिळाला आहे. विजयवाड्यात राहणारे त्याचे पालक तीन अनाथांना दत्तक देऊन त्यांचे पालनपोषण करतात. त्याचबरोबर नूरीच्या या समाजसेवेमुळे कडप्पा येथील लोक प्रेमाने त्याला मदर तेरेसा म्हणत. आरोग्यसेवेतूनच ईश्वरसेवेचा ध्यास घेणार्‍या नूरी त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा देत आहेत. तर काहींना आदर्शवत कार्याचा वास्तुपाठच घालून दिलेला आहे. नीतिमूल्ये सांभाळून आणि सामाजिकतेद्वारे अविरत सेवाव्रत जोपासणाऱ्या या डॉक्टरचे कौतुक होत आहे

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

प्रेरणादायी! पायाने दिव्यांग असलेली ही युवती रिक्षा चालवून आपल्या वृध्द आईवडिलांचा सांभाळ करतेय

.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here